gautami patil dance program in Ahmednagar police lathi charge crowd watch video  
अहिल्यानगर

Gautami Patil News : नाचणाऱ्या गौतमीवर नोटांची उधळण, पोलीसांनी दिला दांडक्याचा प्रसाद; समोर आला Video

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : मागील काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात अलेली नृत्यांगना गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आणि गोंधळ हे ठरलेलं समीकरण बनत चालंल आहे. गौतमीच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात देखील प्रचंड गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागल्याचे व्हिडीओ समोर आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गौतमी पाटीलच्या हा डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी गौतमीच्या डान्स सुरू असताना जमलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरूवात केली. त्यामुळे या तरुणांना अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेत काही तरुणांनी डान्स सुरू असताना गौतमीवर पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला.

यानंतर कार्यक्रम पंधरा मिनीटं हा शो बंद करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला पण तरुणांची हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. यानंतर पोलिसांनी जमलेल्या तरुणांवर लाठीचार्ज करत त्यांना कार्यक्रम स्थळावरून हुसकवून लावलं.

यावेळी तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे हा कार्यक्रम वेळेपूर्वीच आटोपता घ्यावा लागला. इतकेच नाही तर यानंतर देखील काही प्रेक्षकांनी गौतमी गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला. अखेर बाउन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT