अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षकांची प्रतिमा मलीन होण्याचे प्रकार दरवर्षीच सर्वसाधारण सभेत घडत असतो. यंदा कोरोनामुळे सभा ऑनलाइन असल्याने गोंधळ होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र ती निष्फळ ठरली. सभेत गोंधळ झाल्याने पहिले पाढे पंचावन्नचाच अनुभव पुन्हा आला.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजू राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुमारे दीड तास ही सभा सुरळीत चालू होती. परंतु विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू झाल्यानंतर गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे व शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी 'सभेत बोलू का दिले जात नाही,' असे म्हणत सभागृहात प्रवेश करत संचालक मंडळाला धारेवर धरले. यावेळी सत्ताधारी गटाचे संचालकही आक्रमक झाल्याने गोंधळ सुरू झाला.
जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे, तोपर्यंत 'तनपुरे'चे खासगीकरण होऊ देणार नाही
सभेत दोनदा गोंधळाची परिस्थिती उद्भवली. सुमारे अर्धा तास गोंधळ चालला. या वेळी पोलिस कॉन्स्टेबल अनिल हराळ व बंडू भागवत यांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळ थांबला. त्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली. परंतु डावखरे बोलत असतानाच त्यांना मध्येच थांबविण्यात आले. त्यानंतर पुन्हा गोंधळ झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत या वादावर पडदा पडला.
सत्ताधाऱ्यांनी बॅंकेतील कारभार उघड होऊ नये, म्हणून सभेत बोलून न देण्याचा व आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. रात्रीतून त्यांनी ताळेबंदाचे एक पान बदलले आहे. या संदर्भात आपण जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार आहोत.
-प्रवीण ठुबे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषदविकास डावखरे व प्रवीण ठुबे यांनी आजच्या सभेत घातलेला गोंधळ हा अशोभनीय आहे. ऑनलाइन सभा असल्याने गोंधळ होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र या लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सभेला गालबोट लागले आहे.
- राजकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष, गुरुमाऊली मंडळ
शिक्षक वाड्या-वस्त्यांवर चांगले काम करतो. शिक्षकांची प्रतिमा वाढवणारी ही बॅंक आहे. बॅंकेच्या ऑनलाइन सभेतही गोंधळ झाला. हे थांबले पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने आता आत्मचिंतन करून शिक्षकांची प्रतिम उंचाविण्यासाठी प्रयत्न करावेत.
- डॉ. संजय कळमकर, ज्येष्ठ नेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.