Ghatghar in Akole taluka receives rain for four months 
अहिल्यानगर

निसर्गाचा असाही चमत्कार: दरवर्षी गाव चार महिने असतं धुक्यात; ना दिसतो रस्ता ना गाव

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : मोठं मोठे धुक्याचे डोंगर... त्यामुळे रस्ता दिसेना की गाव दिसेना. चोंढे घाटावरती वसलेले एक गाव धुक्यात हरवले आहे. हे गाव म्हणजे भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर! प्रकल्पग्रस्त म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले हे गाव चार महिने पाऊस व धुके यांच्या लंप डावात सापडलेले असते. दरवर्षी पाच हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणारे व घाटाचा परिसर असल्याने या गावाचे नावही पडले घाटघर! 

जेमतेम ८०० लोकवस्ती येथे आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती. परंतु त्यातील काही जमीन प्रकल्पात गेली असल्याने न्याय हककासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन. न्यायालयात दावे करून भिक नको आम्हाला हवे घामचे दाम आधी पुनर्वसन मग प्रकल्प म्हणत संघर्ष करत येथील ठाकर आदिवासी कांदडी समाजाचे लोक जगत आहेत.

माजी आदिवासी विकास मंत्री यांनी प्रकल्पात हे स्वतंत्र गाव बसवले त्यांना सर्व सुविधा, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य केंद्र, आश्रम शाळा, देऊन घरटी माणसाला नोकरी दिली. मात्र अजून काही मागण्या अपूर्ण असून मध्यंतरी ग्रामस्थांनी वीज प्रकल्प बंद पाडला. त्यामुळे त्यांची शासन दरबारी दखल घेऊन त्यांच्या मागण्या मंजूर केल्या. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. पाऊस व धुके या गावात सतत असते. 

वृध्द, जनावरे घरातच राहतात. भातपीक निम्मेच पदरात पडते. अतिवृष्टीमुळे पीक धुऊन जाण्याचे प्रमाण अधिक असते. वीज टिकत नाही. त्यामुळे पाणी नाही मग झुर्‍याचे पाणी किवा लवाचे पाणी प्यावे लागते. भात मासे आमटी हे त्यांचे मुख्य अन्न. चौमुळी कौलाची घरे पारंपारीक पद्धतीने दगडी बांधकाम, लाकूड, वापरून उभारलेली ही घरे पर्यटकना आकर्षित करतात. 

स्वच्छता, टापटीपपना, घरात वनविभागाने गॅस दिला आला तरी चुलीवरची जेवणाला पसंदी येथील ग्रमस्थ देतात. निसर्गाने नटलेल्या या परिसरला सह्याद्रीच्या डोंगर रांगाने वेडले आहे. त्यावरून पडणारे पांढरेशुभ्र धबधबे, कोकणकड्याच्या परिसरात येणारे धुके, पाऊस व त्याचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक त्यांच्या सेवेसाठी जेवण, चहा, भजी, शेंगा, मका कणीस घेऊन व्यवसाय करणारे  स्थानिकतरुण त्यातून मिळणारा रोजगार. मात्र यावर्षी कोरोणा संकटामुळे पर्यटक बंदी त्यामुळे स्थानिकांना रोजगार नाही.

अतिवृष्टीमुळे शेतीत काहीच नाही. त्यामुळे घाटघर गाव अडचणीत सापडले आहे. 
सरकारने अजून खाव टी दिली नाही. तर पर्यटन सुरू करावे ही ग्रामस्थांनी केलेली मागणी सरकार काय करेल हे माहीत नाही. पण निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाचे अर्थकारण बिघडले हे मात्र खरे. पाऊस आमच्याकडे पडतो त्यामुळे भंडारदरा जलाशय भरते. त्यातून लाभक्षेत्र आनंदी होते. साखर कारखाने, खाजगी कारखाने, दारूचे कारखाने आनंदी होतात. मात्र आमचे रोजचे मरण त्याला कोण रडणार. सरकारने आम्हाला कायमस्वरुपी रोजगार द्यावा, असे येथील आदिवासींचे मत आहे.

घाटघरचे माजी सरपंच धोंडीबा सोंगाळ म्हणाले, अतिवृष्टी झाली. पंचनामे झाले. मात्र भरपाई नाही. चार महिने धुके, पाऊस त्यामुळे घरात बसून राहावे लागते. त्यात भातपीक येत नाही. सरकार भरपाई नाही की खावटी देत नाही. पर्यटन नाही. त्यामुळे रोजगार नाही. पुढारी फक्त मत घेण्यासाठी येतात.

भंडारदरा आमच्या नऊ गावाचा आत्मा आहे. तो भरताना आमचे मोठे नुकसान होते. मात्र पुढारी व लाभक्षेत्रमंडळी धरणावर आनंद व्यक्त करतात. मात्र आमचे काय हाल आहेत. कधी पाहिले का? नऊ गावाला एकाही कारखान्याने कोरोना काळात मदत केली नाही. ते जाणीव नसलेले लोक आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावकरांचा श्वास कोंडला! महामार्गावर धुळीचे लोट, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे बोट

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Latest Marathi News Live Update : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची बंगळुरूत धडक कारवाई

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

SCROLL FOR NEXT