Girl commits suicide for marriage
Girl commits suicide for marriage 
अहमदनगर

धुमधडक्यात लग्न केले नाही म्हणून मुलीने जीवनच संपवले

सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः सध्या कोरोनाने वधूपित्याने कंबरडे मोडले आहे. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने पहिल्यांदा त्याला जगण्याची  लढाई लढावी लागते. मात्र, उपवर मुलींची लग्न लावून देणे हेही कर्तव्य असल्याची त्याची गोची झाली आहे. मात्र प्रशासानाने कमी लोकांमध्ये कोणताही गाजावाजा न करता लग्न लावण्यास परवानगी दिली आहे. खर्च करण्याची ऐपत असणारेही अल्प खर्चात लग्न लावून देत आहेत. कोरोनामुळे लग्नसमारंभातील बडेजाव टाळला जात आहे. त्यातून दोन्ही पक्षाकडील लोकांचे लाखो रूपयांची बचत होते आहे. पारनेर तालुक्यात मात्र वेगळंच घडलं.

वाजत-गाजत, मोठ्या धुमधडाक्‍यात लग्न करून देण्यास आईने नकार दिल्याच्या रागातून पळशी येथील मुलीने घराजवळील झाडाला गळफास घेऊन काल (बुधवारी) आत्महत्या केली. ऋतुजा माधव काळे असे मृत मुलीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : पळशी येथील ऋतुजा हिचे नुकतेच लग्न जमले होते. मात्र, हे लग्न मोठ्या धुमधडाक्‍यात, वाजत-गाजत करावे, अशी ऋतुजाची इच्छा होती. ही इच्छा तिने आईजवळ व्यक्तही केली. मात्र, त्यास आईने नकार दिला. त्यातून माय-लेकीमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून संतापलेल्या ऋतुजा हिने बुधवारी (ता. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. नंतर तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या बाबत नातेवाइकांनी आमची काहीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. पारनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT