The girl who studied in the ashram school became the Deputy Tehsildar 
अहिल्यानगर

संघर्ष आणि कष्टातून घातली यशाला गवसणी 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : वडील आश्रमशाळेत कामाठी. तेही अचानक दिवंगत झाले. त्यांच्या जागेवर आईने स्वयंपाकी म्हणून सेवा करीत सुजाताला शिकविले. सुजाता आश्रमशाळेत शिक्षण घेऊन पोलिस अधिकारी झाली. आज ती एमपीएससी परीक्षा देऊन नायब तहसीलदार झाल्याने आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. 

अकोले तालुक्‍यातील केळी-कोतूळ या आदिवासी भागात जन्म घेतलेल्या या रणरागिनीने पीएसआय पदावरून थेट नायब तहसीलदार या उच्च पदाला गवसणी घातली. सुजाता वायाळ असे या मुलीचे नाव असून, तिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत आई-वडिलांचे नाव राज्यात सर्वदूर पोचवले आहे. केळी-कोतूळ व केळी-रुम्हणवाडीसारख्या आदिवासी भागातून शिक्षणाला सुरवात केलेल्या सुजाता वायाळ हिने आपल्या संघर्षमय जीवनात आलेल्या संघर्षाचा व वाईट अनुभवाचा सामना केला. त्यात सगळ्यात मोठं दुःख म्हणजे वडिलांचं निधन झाले.

घरातील सर्व जण हतबल झाले. याच परिस्थितीत जनसेवा व कुटुंबाला सावरण्याचा ध्यास मनाशी बाळगून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पीएसआय पदावर काम करीत रात्रंदिवस मेहनत घेऊन सुजाता वायाळ हिने आकाशाला गवसणी घालत नायब तहसीलदार होण्याचा मान मिळविला आहे. सुजाताची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने केळी-रुम्हणवाडी या आदिवासी भागात राहूनदेखील आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कधीच सोडले नाहीत. सुजाताने पीएसआय या सन्मानाच्या पदावर काम करत पुढचे प्रयत्न न सोडता रात्रंदिवस मेहनत घेऊन अन्य मुलांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. अहमदनगर 
......  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT