Students educational  esakal
अहिल्यानगर

सावित्रीच्या लेकींची आजही शिक्षणासाठी परवड...

सकाळ वृत्तसेवा

मिरजगाव (जि. अहमदनगर) : मुलींच्या शिक्षणाची (Education) मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीच्या (Savitribai Phule) लेकींची आजदेखील शिक्षणासाठी परवडच होत आहे. एकीकडे सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असताना दुसरीकडे मात्र याच सावित्रीच्या लेकींना शिक्षणासाठी मोठे दिव्य करावे लागत आहे. पावणे दोनशे वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणासाठी जो संघर्ष सावित्रीमाईने केला आजतागायत तोच संघर्ष वेगळ्या रुपात मुलींना करावा लागत आहे.

मुलींची शिक्षणासाठी अनेक कारणांनी फरफट

मुलींच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना सुरु करण्यात आल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवरील मुलींना शाळेत येण्यासाठी आजही कोणत्याही सोयी- सुविधा उपलब्ध नाहीत. अपुरी वाहतूक व्यवस्था आणि नियोजनाच्या अभावी मुलींना मिळेल त्या वाहनात प्रवास करावा लागत आहे. त्यातच सद्य स्थितीला सुरु असलेल्या एसटी संपाचा मोठा फटका मुलींना बसत आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये देखील सद्य स्थितीला मुलींच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची शिक्षणासाठी अनेक कारणांनी फरफट होत असते. एक तर मुलींच्या शिक्षणाबाबत पालकच आग्रही नसतात. ज्या मुली शाळेत जातात, त्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास शाळकरी मुली करत आहेत. अनेक अपघात याकाळात घडत आहेत. सद्य स्थितीला मुलींच्या या प्रश्नाकडे ना शासन गांभीर्याने पाहताना दिसतंये ना शाळा प्रशासन. आज बालिका दिनी बालिकांच्या हक्काच्या मोठ- मोठ्या गप्पा आणि भाषणे मारण्यापेक्षा मुलींच्या सुरक्षित प्रवासाची कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

प्रवासाचे सर्व नियम धाब्यावर

खेड्या पाड्यातून शाळेला नियमित प्रवास करणाऱ्या मुलींच्या सुरक्षित प्रवासाची खबरदारी म्हणून वाहन चालकांसाठी शासनाकडून नियमावली जाहीर केली आहे. यात वाहनाची आसन क्षमता, सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परंतु सद्य स्थितीला या सर्व नियमांना हरताळ फासून धोकादायक प्रवास सुरु आहे. वाहतूक पोलिसांचे देखील याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

शाळकरी मुलींसाठी स्वतंत्र एसटी सुरु करावी

हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सायंकाळी लवकर अंधार पडतो. यामुळे मुलींना मिळेल त्या वाहनात उभा राहून प्रवास करावा लागत आहे. जोपर्यंत एसटी नियमितपणे सुरु होत नाही, तोपर्यंत शाळकरी मुलींसाठी तरी किमान स्वतंत्र विशेष एसटीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थीनी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT