The girl's wedding, which was only two days away, was postponed 
अहिल्यानगर

दोन दिवसांनीच होतं मुलीचं लग्न; वधूपिता म्हणाला, कोरोना गेल्यावर करू

आनंद गायकवाड

संगमनेर ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कन्येचा विवाह ठरला होता. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने तारीखही मंगळवार (ता. 30) मार्च निश्‍चित झाली होती. त्यानुसार विविध खरेदी व इतर सोपस्कार झाले. मात्र, संगमनेर तालुक्‍यात पुन्हा वाढलेल्या कोरोनामुळे वैद्यकिय व्यावसायिक असलेल्या वधुपित्याने वराकडील मंडळींशी समन्वय साधून विवाह सोहळा काही कालावधीसाठी लांबणीवर टाकीत सामाजिक भान जपले. 

दिवंगत कॉंग्रेस नेते माजी मंत्री, बी. जे. खताळ पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभल्याने, वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजातील इतरांचे भले व्हावे या हेतूने खताळ यांनी लग्न समारंभ रद्द केला.

नुकताच काही दिवसांपूर्वी त्यांची कन्या श्रुतकिर्ती हीचा विवाह ठरला होता. विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला. वैद्यकीय व्यावसायिक असल्याने, शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन होत नसल्याची माहिती खताळ यांना होती.

50 वऱ्हाडींच्या मर्यादेतही कोरोनामुळे आपल्या इष्टमित्र व आप्तेष्टांना धोका निर्माण होण्याची बेजबाबदारी न स्विकारता व इतरांच्या सुरक्षिततेला महत्व देत डॉ. खताळ दांपत्याने लग्न समारंभ काही काळासाठी पुढे ढकलला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT