Good news ... so many people in the city beat Korana 
अहिल्यानगर

गुडन्यूज...नगरमध्ये तब्बल इतक्‍या जणांची कोरानावर मात

सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिवसाला 20 ते 25 जणांचा लॉट येत असल्याने नगरकरांची झोप उडाली आहे, तर प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या कमालीची वाढत असल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. 

आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालातून चांगल्याच समाचाराची बातमी आली. ती म्हणजे नगर जिल्ह्यातील आठ रुग्णांची कोरोनावर मात मिळवली. त्यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यात नगर शहर चार, श्रीगोंदे तीन आणि कोपरगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांची असलेली अहोरात्र सेवा फळाली आली आहे. जिल्ह्यात सुमारे महसूल, आरोग्य, पोलिस आदी साडेनऊ हजार कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जरी 422 झाली असली, तरी जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल 291 म्हणजेच तीनशेच्या घरात पोचली आहे. ही नगरकरांसाठी खुशखबर आहे. आता सध्या 117 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, आज सकाळीच 65 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT