corona 19 
अहिल्यानगर

शासकीय कर्मचाऱ्याने मुख्यालय सोडल्याने झाला कोरोना 

अमित आवारी

नगर : जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे दिलेले आदेश डावलत जिल्ह्यातील कर्मचारी कोरोना बाधितांना व आजारी रुग्णांना भेटून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा केवळ नावालाच उरला आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना लॉकडाउनच्या नावाखाली वेठीस धरणारे प्रशासन मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना थांबविण्यात मुख्यालयात ठेवण्यास कमी पडत आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकाऱ्यांना क्‍वारंटाईनची शिक्षा, नायब तहसीलदार रितसर पास काढू गेले तरी गुन्हा दाखल करण्यात येतो मात्र त्याच वेळी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पास न काढता जाऊनही सोडून देण्यात येते. या वेगवेगळ्या न्यायामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे धाडस वाढत असल्याची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांत आहे. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश काढून शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालय (काम करत असलेले गाव) न सोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र नगर शहरातील एका शासकीय महाविद्यालयातील कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत बाहेर गावी गेला. तेथे त्याला कोरोनाची लागण झाली. कोराना पॉझिटिव्हचा रिपोर्ट हाती येण्या आधी हा महाशय महाविद्यालयातील प्राचार्यांचा "बर्थ डे' करून आला. त्यामुळे या महाविद्यालयातील प्रशासनावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पूर्वी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळा "न्याय' दिल्यामुळे कर्मचाऱ्यांत असे धाडस निर्माण होत असल्याची चर्चा सध्या शासकीय कर्मचाऱ्यांत आहे. 

शहरातील एका शासकीय महाविद्यालयातील कर्मचारी भिंगार परिसरात राहतो. तो काही दिवसांपूर्वी कोल्हार येथील आपल्या आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी वडिलांसह गेला. काही दिवसांतच त्याच्या वडिलांनाही खोकला, ताप असा त्रास होऊ लागला. त्याच्या नातेवाईकाची कोरोना चाचणी केल्यावर तो बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्या वडिलांचीही तपासणी करण्यात आली. वडीलही कोरोना बाधित आढळून आले. त्यांना लोणी (ता. राहाता) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे महाशय पुन्हा वडिलांना भेटण्यासाठी लोणीला गेले. दरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे महाशय बुके घेऊन हजर. बुके दिल्यावर दोन दिवसांनी हे महाशयही कोरोना बाधित आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT