The government is only interested in quarreling with Kangana 
अहिल्यानगर

कंगणासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करा, खासदार विखे पाटलांचा सरकारा टोला

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी टोला लगावला.

साई संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणे संस्थान आस्थापनेवर घ्यावे. कोविड सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात मागे घ्यावी. केंद्र सरकारप्रमाणे संस्थान कर्मचाऱ्यांच्या ग्रच्युईटीबाबत निर्णय करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज संस्थान कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे डॉ. विखे पाटील यांना देण्यात आले.

कामगार संघटनेचे नेते राजेंद्र जगताप, तुषार शेळके, राजेंद्र कोते, प्रताप कोते, विलास गोंदकर, यादवराव कोते आदी उपस्थित होते. 

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""कोविड सेवेत असलेल्या कंत्राटी कामगारांना अधिक मोबदला देण्याऐवजी त्यांची वेतनकपात केली. समितीचे सदस्य स्वतःचा पगार कमी करणार आहेत का?

साई संस्थानचे काम पाहणारी समिती अधिकारांचे उल्लंघन करते. सरकारने यापूर्वी घेतलेले निर्णय फिरविण्याचा अधिकार समितीला नाही. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना गेल्या तीन महिन्यांपासून वेळ देत नाही. आठ दिवसांत वेळ दिला नाही, तर समिती सदस्यांच्या कामकाजाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू. येत्या महिनाभरात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थकारणाला चालना देण्यासाठी साई मंदिर खुले करू.'' 

ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी घंटानाद करून आंदोलनास पाठिंबा दिला. माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, नितीन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, सचिन तांबे, साईराज कोते, नगरसेवक दत्तात्रेय कोते आदी उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

Latest Marathi News Live Update: संघाचे कार्य संघ स्वयंसेवकांच्या श्रमाने सुरु- मोहन भागवत

SCROLL FOR NEXT