The governments Revenue Vijay Saptapadi Abhiyan is a relief to the common man.jpg
The governments Revenue Vijay Saptapadi Abhiyan is a relief to the common man.jpg 
अहमदनगर

मंत्री गडाखांचे नेतृत्वाखाली प्रलंबित प्रश्न मार्गी लावू

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : शासनाचे महसूल विजय सप्तपदी अभियान हे सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारे आहे. या अभियानाद्वारे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे तालुक्यातील उपेक्षित घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन माजी सभापती सुनीता गडाख यांनी केले.

नेवासे पंचायत समितीच्या सभागृहात बुधवार (ता. १७) रोजी महसूल विजय सप्तपदी अभियानाचा शुभारंभावेळी गडाख  बोलत होत्या. सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, नगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, नेवासे उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, कारभारी जावळे, पंचायत समितीचे सदस्य विक्रम चौधरी, रविंद्र शेरकर, बाळासाहेब सोनवणे, राजनंदिनी मंडलिक, सविता झगरे, कारभारी डफळ,  उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, सतीश पिंपळे यावेळी उपस्थित होते.

श्रीनिवास अर्जुन म्हणाले, महसूल विजय सप्तपदी अभियान अंतर्गत शेत रस्त्यांचे अडघळे दूर करणे, पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे, तुकडे नियमित करणे, पोटखराबा क्षेत्राचे लागवडी लायक क्षेत्रात रूपांतर करणे, माजी खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित जमिनी वाटपाबाबत कालबाह्य कार्यक्रम आखून सामोपचाराने वाटप निर्णय घेण्यात येईल. गाव तेथे स्मशानभूमीचे प्रश्न, घरकुलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी प्रास्ताविक करताना अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आमचा राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी अतिवृष्टीग्रस्थाना धनादेश तर घरकुलसह आदीपत्रांचे गडाख यांच्या हस्ते  वाटप  करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.रेवणनाथ पवार यांनी केले.

धनादेश व पत्र वाटप असे 

अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या २९ जणांना नुकसान भरपाईच्या अनुदान धनादेशचे वाटप करण्यात आले तर महावास घरकुल अतिक्रमण नियमितीकरण अंतर्गत ६४, तुकडे नियम मोहिमेच्या अंतर्गत १० तर पोट खराबा वर्ग-अ क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशाच्या पत्राचे वितरण यावेळी माजी सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते प्रमुख करण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT