Grain supply to 18 thousand families in Ahmednagar district has been temporarily suspended 
अहिल्यानगर

जिल्ह्यातील 18 हजार कुटुंबांचे धान्य बंद

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर :  मागील पाच महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांतून धान्य न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य शिल्लक राहत होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू केली. हे काम 93 टक्के पूर्ण झाले आहे. त्यानुसार 18 हजार 278 शिधापत्रिकाधारकांचा धान्यपुरवठा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
 
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे राज्यात आधार लिंकिंग (एईपीडीएस) करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे लाभार्थींच्या ठशांची (बायोमेट्रिक) ओळख पटवून रेशनवरील धान्याचे वाटप केले जाते. कोरोना संकटाच्या काळात बायोमेट्रिक पद्धत बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर बायोमेट्रिक पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली. ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत सलग धान्य न घेणारी 18 हजार 254 कुटुंबे आढळून आली. अंत्योदय (एएवाय) योजनेखालील 1 हजार 258, तर प्राधान्य कुटुंब (पीएचएच) योजनेतील कुटुंबांचा त्यांत समावेश आहे. ही कुटुंबे धान्य उचलत नसल्याने जिल्ह्यातील धान्य न घेण्याचे प्रमाण सुमारे 80 टक्‍के मर्यादित झाले होते. 

जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने धान्य न घेणाऱ्या कुटुंबांना धान्य घेऊन जाण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यांना अस्तित्वात असलेले दाखले जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. 

तालुकानिहाय अपात्र शिधापत्रिकाधारक 

जामखेड- 702, कोपरगाव- 1147, नगर शहर- 2011, नगर तालुका- 471, कर्जत- 1333, श्रीगोंदे- 1551, राहुरी- 1097, राहाता- 800, पारनेर- 1340, नेवासे- 2500, पाथर्डी- 743, शेवगाव- 1490, श्रीरामपूर- 1103, संगमनेर- 1169, अकोले- 821 जिल्हा- 18 हजार 278.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT