Grain theft caught in Shevgaon 
अहिल्यानगर

स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्याबाजारात चालल्याचा आला संशय अन

सचिन सातपुते

शेवगाव : स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी नेत असल्याच्या संशयावरून खानापूर येथे आज दुपारी ग्रामस्थांनी तीन तास टेम्पो अडवून धरला.

अखेर पोलिस व महसूल अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर शहरातील शासकीय गोदामात टेम्पो आणला. तेथे स्वत: तहसीलदार अर्चना भाकड यांनी धान्याची पडताळणी केली. टेम्पोतील धान्य वैध आढळून आल्यावर ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला. 

शेवगाव येथील शासकीय गोदामातून स्वस्त धान्य घेऊन आज दुपारी गाडे ट्रान्सपोर्ट, नगर यांचा टेम्पो (एमएच 16 एई 3350) खानापूरला आला. तेथे 27 क्विंटल गहू व 17 क्विंटल तांदूळ, तसेच दहिफळ येथील गरीब कल्याण योजनेचा साडेआठ क्विंटल तांदूळ, असा एकूण 52.50 क्विंटल गहू व तांदूळ आणला होता.

खानापूर येथे दुपारी स्वस्त धान्य दुकानासमोर टेम्पो उभा केला असता, टेम्पोत प्रमाणापेक्षा जास्त धान्य असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. हे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी सुमारे तीन तास टेम्पो अडवून धरला.

या बाबत तहसीलदार भाकड यांना माहिती दिली. त्यांनी पुरवठा विभागाचे गोदाम कीपर सोमनाथ आव्हाड व पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना तातडीने खानापूर येथे पाठविले. मालाच्या पावत्या व धान्य बरोबर असल्याचे गोदाम कीपर आव्हाड यांनी ग्रामस्थांना सांगितले. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने ग्रामस्थांनी धान्य उतरू देण्यास विरोध केला.

अखेर सर्व माल पुन्हा शासकीय गोदामात आणला. तेथे तहसीलदार भाकड यांनी स्वत: पडताळणी केली असता, सर्व माल वैध असल्याचे स्पष्ट झाले. 

 
स्वस्त धान्याबाबत काही तथ्य असल्यास तक्रार करा. मात्र, विनाकारण तक्रार करून कोरोना संकटात लाभार्थींना धान्यापासून वंचित ठेवू नका, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
- अर्चना भाकड, तहसीलदार, शेवगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT