Gram Panchayat election expenses have to be submitted within three days 
अहिल्यानगर

सावधान! तीन दिवसांत खर्च सादर केला नाही, तर तुमचं ग्रामपंचायत सदस्यपद जाईल

गोरक्षनाथ बांदल

नगर ः ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च सादर केला नाही तर निवडणूक यंत्रणा अपात्र ठरवते. जे निवडणुकीत हरले आहेत, त्यांनाही खर्च सादर करावा लागणार आहे. तीन दिवसांत खर्च सादर केला नाही तर तुम्ही निवडून आला असला तरी घरी बसावे लागेल.

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी झाली. निकालानंतर सर्व उमेदवारांना महिनाभरात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीपर्यंत हा खर्च सादर करावा लागणार आहे.

यासाठी उमेदवारांकडे अवघे तीन दिवस उरले आहेत. निवडणूक खर्च सादर न केल्यास पदावर गंडांतर येऊ शकते. 

कोरोनामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका रखडल्या होत्या. नंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर 18 जानेवारीला मतमोजणी झाली.

मतमोजणीनंतर महिनाभरात प्रत्येक उमेदवाराला तहसील कार्यालयात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. खर्च सादर न केल्यास जिल्हा प्रशासन संबंधित उमेदवारांना नोटीस बजावते.

संयुक्तिक कारण न दिल्यास उमेदवारावर कारवाई केली जाते. विजयी उमेदवाराचे पद रद्द होऊ शकते. आगामी सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT