The Gram Panchayat has a loan of Rs 84 crore 
अहिल्यानगर

ग्रामपंचायत विभागाची यांच्याकडे आहे 84 कोटींची उधारी

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्हा परिषदेला महसूल, उपकर, वाढीव उपकर, पाटबंधारे आदी विभागांकडून किती येणे बाकी आहे, याचे गणित ग्रामपंचायत विभागाकडून जुळविण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेला 98 कोटी येणे व थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले. मुद्रांकचे 14 कोटी आले असून, त्याचे उर्वरित 84 कोटींचे येणे बाकी आहे.

जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्क अनुदान, सामान्य-जमीन महसुलावरील उपकर, वाढीव उपकर, उपकरणाची नुकसान भरपाई, वाढीव उपकराची नुकसान भरपाई, उपकरावर प्रोत्साहनपर अनुदान व पाटबंधारे विभागाकडून येणाऱ्या "सेस'ची माहिती यांची ग्रामपंचायतीने जुळवाजुळव केली.

98 कोटींचे येणे असल्याचे त्यामध्ये स्पष्ट झाले आहे. विविध विभागांकडून येणे रक्कम आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महसुलात वाढ होणार असल्यामुळे, त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पाठपुरावा सुरू आहे.

या पाठपुराव्यामुळे मुद्रांकचा चौदा कोटींचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, तो तालुका व जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला आहे. 

येणे बाकी अनुदान 
जमीन महसुलावरील उपकर ः 16 कोटी, जमीन महसुलावरील वाढीव उपकर ः 25 कोटी, जमीन महसुलावरील उपकराची नुकसान भरपाई ः साडेचार कोटी, जमीन महसुलावरील वाढीव उपकर ः दहा कोटी, उपकरावर प्रोत्साहनपर अनुदान ः अकरा कोटी, पाटबंधारे विभाग ः दहा कोटी. 
 
मुद्रांकचे आलेले अनुदान व वितरित झालेले अनुदान 
मुद्रांकची 2019-20मध्ये 17 कोटी 80 लाख 37 हजार 144 रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 13 कोटी 96 लाख 71 हजारांचे येणे आले असून, उर्वरित रक्कम थकीत आहे.

आलेल्या रकमेतून सहा कोटी 98 लाख 35 हजार 500 रुपये तालुकास्तरावर व तेवढेच अनुदान जिल्हास्तरावर वितरित करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT