Grandma in Nevasa knows which crop gets the best market price 
अहिल्यानगर

या ९४ वर्षांच्या आजीला कळतं कोणत्या पिकाला किती भाव येणार ते!

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर): शेतकऱ्याला पिकवायचं कळतं पण विकायचं कळत नाही. त्याच्या याच अज्ञानाचा अनेक व्यापारी फायदा उचलतात. परंतु घरात जी जुनी जानती माणसं आहेत, त्यांना हवामानाचं, बाजाराचं गणित चांगलंच कळतं. नेवासा तालुक्यात अशीच एक आजी आहे तिला सगळं कळंत.

संपूर्ण नातेवाईकांत आण,बाण आणि शान म्हणून नाव लौकिक असलेल्या ९४ वर्षीय आजीने आपल्या कांदापीकासह सोशल मीडियावर केलेली एंट्री चांगलीच गाजली आहे. 

खरवंडी (ता.नेवासे) येथील ९४ वर्षीय आसराबाई मनाजी भोगे या वयातही कुटुंब, वस्ती आणि नातेवाईकांत आपल्या अनुभवामुळे प्रसिद्ध आहेत. शेतपीकाच्या अधिक उत्पादनासाठी त्यांचा सल्ला गाॅडफादर म्हणून मानला जातो. कारण त्यांचा अंदाज कधीच चुकत नाही. त्यांचे नातू दादासाहेब भोगे यांनी कांद्याच्या जुडीसह आजीचे छायाचित्र 'होय आम्ही महाराष्ट्र शेतकरी' या फेसबुक पेजवर टाकले आणि लाईक्सचा पाऊस सुरू झाला.

अनुभव आहे दांडगा

आजी या वयातही तास, दोन तास शेतात राबतात. त्यांना चांगले ऐकू येते, चष्मा लागलेला नाही आणि चांगल्या ताडताड चालतात देखील. पीक कोणते घ्यावे, काय टाळावे हा त्यांचा ठोकताळा नेहमीच यशस्वी होत आलेला आहे. मागील वर्षी भरपूर पाऊस झाल्यानंतर आजी म्हणाल्या होत्या, "कांदा कल्याण करी आता!". आणि खरोखरच कांद्याला अच्छे दिन आले. सध्याही कांदा भाव खावून चालला आहे.

नातू दादासाहेब आजीला विचारूनच शेतात पीक घेतो. आजीचे फेसबुकवर झळकलेले छायाचित्र व त्यास महाराष्ट्रातून मिळलेली वाहवा तालुक्यात कौतुकाचा विषय झाला आहे. अनेक युवा शेतकरी, शेती तज्ज्ञ व उद्योजकांनी आजीचे व कांदापीकाचे तोंडभरून कौतुक केल्याने भोगे परीवार भारावून गेला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT