Prajakta Tanpure Sakal
अहिल्यानगर

शेतकऱ्यांचा आनंद हेच समाधान : प्राजक्त तनपुरे

पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. नगर) : राहुरी विधानसभा मतदारसंघात कोलमडून पडलेल्या उर्जा विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्राधान्य दिले. वीजपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने मिळण्यासाठी नवीन दीडशे रोहित्र दिले. नवीन रोहित्र मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते, असे प्रतिपादन ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

बारागाव नांदूर येथे वीज रोहित्राचे लोकार्पण व मुळा नदीवरील पुलाच्या कामासाठी पूर्वपाहणी प्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी भास्कर भालेराव होते. प्रभाकर गाडे, श्रीराम गाडे, मच्छिंद्र गाडे, नवाज देशमुख, उपसरपंच इजाज सय्यद, निवृत्ती देशमुख, सागर तनपुरे उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, ‘‘निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी अग्रक्रम असतो. मुळा नदीपात्राच्या पलीकडे असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी लवकरच पुलाचे बांधकाम केले जाईल. त्यासाठी ग्रामविकास निधी अंतर्गत २५ लाख रुपयांची तरतूद केली जाईल. या पुलामुळे १०३ शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल.’’ नगराध्यक्षपदी असताना शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं 28 हजारांनी स्वस्त! 2026 वर्षातला सर्वात स्वस्त दर; लग्नसराईआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजा भाव

Amitabh Bachchan: जलसा बंगल्यावरील गोळीबाराचा कट उधळला, बिग बींचे सूचक पोस्ट; म्हणाले 'बच गए'

Nagpur Airport : विमानतळावर आजपासून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल

Latest Marathi News Update : पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या अर्धाकृती पुतळ्याचे उद्या अनावरण; अमित शहा यांच्या हस्ते होणार लोकार्पण, सुप्रिया सुळेही राहणार उपस्थित

Nagpur News: पाण्याची पातळी रोज एक टक्का खोलात ;तोतलाडोह जलाशयाची स्थिती चिंताजनक, केवळ २२ टक्के साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT