Green fodder for animals and bread for dogs 
अहिल्यानगर

मुक्‍या जिवांचे दु:ख पुसण्या जामखेडचे युवक सरसावले 

वसंत सानप

जामखेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जामखेडमध्ये दोन महिन्यांपासून लॉकडाउन आणि हॉटस्पॉटमुळे सर्वत्र "बंद' असल्याने, या काळात कोणी उपाशी राहू नये म्हणून दातृत्वसंपन्न अनेक व्यक्तींनी मदतीचा हात दिला. कोणी गरजूंना धन्य दिले, किराणा दिला ,भाजीपाला दिला. मात्र, मुक्‍या प्राण्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय शहरातील काही युवकांना आला. त्यांनी ठरवले, की आपण मुक्‍या जनावरांना चारा आणि कुत्र्यांना भाकरी रोज पुरवायची. हा उपक्रम नित्याचा झाला. तब्बल दोन महिन्यांपासून येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या खांद्याला खांदा लावून शहरातील अनेक तरुण पुढे सरसावले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश थांबलाय. राज्ये थांबली, गावे थांबली. मात्र, थांबली नाही ती भूक! ज्याच्याकडे आहे, त्याने त्याचे भागविले. मात्र, ज्यांच्याकडे नाही, त्यांना समाजातील दातृत्वसंपन्न व्यक्तींकडून मदतीचे हात मिळाले. मात्र, भूक लागली हे सांगू न शकणाऱ्या मुक्‍या प्राण्यांची भूक जाणली जामखेडमधील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रफुल्ल सोळंकी, गणेश भळगट, संदेश कोठारी, मनोज दुगड, राहुल राकेचा, रोहन कोठारी या कार्यकर्त्यांनी. 

शहरात मोकाट फिरणाऱ्या गायी व इतर मुक्‍या प्राण्यांसाठी त्यांनी रोज घास व हिरवा चारा खरेदी करून आणला आणि मोठ्या प्रेमाने खाऊ घातला. याकरिता शहरातील प्रमुख रस्त्यावर हे तरुण रोज विशिष्ट वेळेला चारा घेऊन जनावरांसाठी टाकत असलेले पाहायला मिळत होते. शहरात फिरणाऱ्या कुत्र्यांसाठीही त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि भाकरी रोज देण्याचे काम केले. लॉकडाउनच्या काळात मुक्‍या जनावरांना अन्नपुरवठा करणारे हे अन्नदाते त्यांच्यासाठी देवदूतच ठरले. त्यांचे हे कार्य जामखेडकरांच्या कायम स्मरणात राहील हे मात्र निश्‍चित!.. 

चपात्या लाटणाऱ्या आणि भाकरी थापणाऱ्या जामखेडच्या निर्मलाताई खेत्रे यांनी रोज स्वतःच्या घरची सर्व कामे आटोपून या मुक्‍या प्राण्यांसाठी लागणाऱ्या चपात्या, भाकरी तयार करून दिल्या. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य संजय कोठारी यांनी त्यांना पुरविले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT