Guardian Minister Hasan Mushrif came into action mode
Guardian Minister Hasan Mushrif came into action mode 
अहमदनगर

पालकमंत्री हसन मुश्रीफ आले अॅक्शन मोडमध्ये

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतरही हसन मुश्रीफ यांनी फारसे मनावर घेतले नव्हतं. ते फारसे जिल्ह्यात येतही नव्हते. कोरोनाचा कहर सुरू असतानाही त्यांनी प्रशासनाच्या कामात दखलअंदाजी केली नाही.मात्र, आता ते शेतकऱ्यांचंया प्रश्नाबाबत अॅक्शमोडमध्ये आले आहेत.

 ""हवामान खात्याने यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाच्या उत्पादनाचा उच्चांक होणार आहे. शेतकऱ्यांना मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

युरिया, डीपी आदी खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत; परंतु यंदा शेतकऱ्यांची अडवणूक करून जर कोणी काळाबाजार करीत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत,'' अशी माहिती ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, ""खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा बी-बियाण्यांची कमतरता भासणार नाही. "मागेल त्याला शेततळे' योजनेत 15 हजार 74 शेततळ्यांना मान्यता देऊन 13 लाख 76 हजार शेततळ्यांसाठी 12 लाख 68 हजार अनुदान प्राप्त झाले आहे.

आतापर्यंत 24 हजार 131 शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना तो मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याचप्रमाणे कांदाचाळ, अवकाळी पावसासंदर्भात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी सरकार निश्‍चितच विचार करील. कर्जमाफी योजनेत जिल्ह्यात सर्वाधिक 1460 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. पिकांसाठी शेतकऱ्यांना लवकरच कर्ज उपलब्ध करून देणार आहोत.'' 

""रोहित्र जळून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी रोहित्र दुरुस्तीच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या आहेत. टॅंकरसंदर्भात प्रस्ताव आल्यास त्याचे अधिकार आता संबंधित प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात धान्याचे वितरण अंतिम टप्प्यात आहे,'' अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली. 

""केंद्राच्या आदेशाप्रमाणे परप्रांतीयांना सोडण्यासाठी आणि आपल्या राज्यातील नागरिकांना आणण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र, जे या जिल्ह्यात बाहेरून आणले जातील, त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केल्याशिवाय घरी सोडले जाणार नाही. लॉकडाउन वाढविण्याबाबत केंद्र सरकार सूचना देईल, त्याप्रमाणे निर्णय घेता येईल.

जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णयही केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार घेतला जाईल,'' अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आदी उपस्थित होते. 


जिल्ह्यात उद्योगाला गती 
एमआयडीसीतील कामगारांना येण्या-जाण्यासाठी सायकल, मोटरसायकलसाठी वैयक्तिक पास दिले जाणार आहेत. जिल्ह्यात 225 कारखाने आजअखेर सुरू झाले आहेत. त्यांमध्ये तीन हजार 530 कामगार ड्यूटी बजावत आहेत. त्यामुळे उद्योगांच्या चाकांना गती आली असून, लवकरच मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होतील, असा विश्‍वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 

शासन गंभीर अन्‌ खंबीर 
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. राजा असो वा रंक; कोणीही त्यातून वाचला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांनो, धोका अजून संपलेला नाही. जिल्ह्याला दिल्लीतील तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमावरून आलेले नागरिक भोवले आहेत. एकजुटीने कोरोनाचा सामना करू या. त्यामुळे नागरिकांनी स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी. विनाकारण बाहेर पडू नका. सरकार गंभीर अन्‌ खंबीर आहे, अशी ग्वाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली. 
 
राज्यपाल राजकारण करणार नाही! 
""येत्या 28 मेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाचे सदस्य होण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या भूमिकेवर आम्हाला पूर्ण विश्‍वास आहे. ते मुदतीत योग्यच निर्णय घेतील. यात अजिबात राजकारण करणार नाहीत,'' असा निर्वाळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT