Guardian Minister Mushrif comes to Ahmednagar as a guest 
अहिल्यानगर

पालकमंत्री मुश्रीफ पाहुण्यासारखे नगरला येऊन जातात, विखे पाटलांंचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः ""जिल्ह्यात कोरोनोबाधित रुग्णांचे वाढते मृत्यू व संख्येला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. जिल्ह्यातले तीन मंत्री काय करतात, ते जनतेला कळत नाही. रुग्ण बेडसाठी वणवण भटकतात. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांवर फक्त केंद्र सरकारवर टीका करण्याचे काम दिले आहे,'' अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

विखे म्हणाले, ""प्रशासनाला रुग्णांचे हाल दिसत नाहीत. मंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा रेमडेसिव्हिर व ऑक्‍सिजनची उपलब्धता त्वरित करायला हवी. प्रत्येक मंत्र्याला आपल्या मतदारसंघात, जिल्ह्यात 200 बेडचे कोविड रुग्णालय उभारायला सांगायला हवे. केवळ फेसबुकवर संवाद साधून जनतेचे समाधान होणार नाही, हे लक्षात घ्या.'' 

""केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. त्यामुळेच देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले, याचा सोयीस्कर विसर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पडला आहे. राज्यातील मंत्री आपले अपयश झाकण्यासाठी कोविड लसपुरवठ्याला राजकीय वळण देत आहेत,'' असे विखे पाटील म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT