Gundegaon, Ralegan, Deulgaon lockdown 
अहिल्यानगर

नगरला कोरोनाचा वेढा, गुंडेगाव, राळेगण, देऊळगाव लॉकडाउन

दत्ता इंगळे

नगर तालुका : नगर तालुक्‍यात एका मागून एक कोरोना रुग्ण निघत असल्यामुळे आता नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले असून आता गावांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊन करण्यास सुरवात केलेली आहे.

गुंडेगाव (ता. नगर) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. तो सावेडी (नगर) येथील स्थानिक आहे. गुंडेगावात त्याचे दुकान असून अनेकांशी त्याचा रोजचा संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दहा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या संपर्कतील लोकांची तपासणी करून त्यांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. 

घोसपुरी येथील ठोकळवाडीतील एकाला सर्दी व खोकला असल्याने त्याची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधिताच्या संपर्कातील लोकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. 
शहरापाठोपाठ आता कोरोना ग्रामीण भागात आपले पाय फैलावल्यामुळे ग्रामीण भागात उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

गुंडेगावमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संजय कोतकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान गुंडेगावात बाधीत रुग्ण सापडल्याने गुंडेगावशी कायम संपर्कात असणारे राळेगण म्हसोबा येथे खबरदारीसाठी तीन दिवस संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे, असे उपसरपंच सुधीर भापकर यांनी सांगितले.

गुंडेगावातील नागरिकांचा रोजचा व्यवहारीक व बॅंकशी संबंध देऊळगाव सिध्दीत येत असल्याने येथे बॅंकेसह सर्व सेवा सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, असे उपसरपंच नाना बोरकर यांनी सांगितले.

वाळकी महसूल मंडळातील घोसपुरी येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने वाळकीतही कठोर उपाययोजना योजण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

वाळकी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे हे ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत. 

वडारवाडी, नवनागापूर, डोंगरगण, टाकळी काझी, विळद, वाकोडी, नागरदेवळे आदी परिसरातही कोरोना आपला शिरकाव केलेला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT