Hammer will fall on illegal constructions on Sonai-Shingnapur road
Hammer will fall on illegal constructions on Sonai-Shingnapur road 
अहमदनगर

सोनई-शिंगणापूर रस्त्यावर बेकायदा बांधकामांवर पडणार हातोडा

सुनील गर्जे

नेवासे : सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण व विना परवानगी नियमबाह्य बांधकाम त्वरित काढण्याच्या राष्ट्रीय महामार्गचे उपविभागीय अभियंता नगर विभागाने रस्त्यावरील दुकानदारांना दिल्या आहेत.

रोडच्या मध्यापासून दोन्ही बाजूने 14 मीटर असा संपूर्ण 28 मीटरचा रस्ता होणार असल्याची सोनईत मोठी चर्चा चालू झाली आहे. राहुरीपासून सर्व अतिक्रमण यापूर्वीच काढले असून फक्त सोनईतील अतिक्रमण काढणे बाकी होते. संबंधित विभागाने नोटीस बाजावल्याने अतिक्रमणधारकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहमदनगरचे उपविभागीय अभियंता दि .ना. तारडे यांनी अतिक्रमण धारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यात राहुरी शनिशिंगणापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 या साखळी क्रमांक 18 /720 मध्ये रस्त्याच्या उजव्या डाव्या बाजूस विनापरवानगी अनधिकृत बांधकाम केलेले आहे. सदर बांधकाम ही राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन झालेले आहे.

सदरचे अनाधिकृत नियमबाह्य बांधकाम हे सरकारी जागेतील असल्याने ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात काढून घ्यावे अन्यथा या खात्यामार्फत सदरचे बांधकाम काढण्यात येईल आणि त्याचा खर्च आपणा कडून वसूल केला जाईल. आपल्या होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार रहाल याची कृपया नोंद घ्यावी असे म्हटले आहे. ही नोटीशीची प्रत नेतहसीलदार कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक, उपविभागीय अधिकारी नगर यांनाही पाठवली आहे.


"राहुरीपासून सर्व अतिक्रमण काढले गेले आहेत. फक्त सोनईतील अतिक्रम काढणे बाकी होते. मुळातच रस्ता मंजूर होतांनाच अतिक्रमण काढले जाणार आहे , याची सर्व सूचना संबंधित लोकांना दिली गेली होती. तशा नोटिसासुद्धा दिल्या गेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकामुळे अतिक्रमण काढले गेले नव्हते, आता लवकरच ही अतिक्रमण काढणार आहे. 
- संतोष काळे, शाखाअधिकारी, राष्ट्रीय महामार्ग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT