mobile towers
mobile towers Sakal
अहमदनगर

Crime : दारू पिला अन् पक्ष्याच्या शिकारीसाठी टॉवरवर चढला; तोल गेल्याने जीव गमावून बसला

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी मोबाईलच्या टॉवरवर बसलेल्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी दारुच्या नशेत टॉवरवर चढलेल्या युवकाचा तोल गेल्याने उंचावरुन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना अंभोरे (ता. संगमनेर) येथे आज पहाटे दीडच्या सुमारास घडली. गणेश भास्कर गवळी (वय २७) असे मयत युवकाचे नाव आहे.

गणेश गवळी हा युवक लहानपणापासून त्याचे मेहुणे काळू बर्डे यांच्याकडे राहण्यास होता. त्याच्या विवाहानंतरही तो पत्नी आणि दोन मुलींसह अंभोरे येथे राहात होता. तो राहात असलेल्या परिसरात रात्री लग्नाची वरात असल्याने, गणेश याने तेथे मद्य प्राशन केल्याचे समजते.

त्यानंतर मद्याच्या धुंदीत तो गावातील बंद असलेल्या मोबाईलच्या टॉवरवर पक्षी पकडण्यासाठी चढला होता. मात्र उंचावरील टॉवर चढताना तोल सांभाळला न गेल्याने, तो खाली कोसळत असताना एका लोखंडी बारला अडकला. हे दृष्य सकाळी ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

याबाबत पोलिस पाटील विनोद साळवे यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात तूर्तास पाणीकपात नाही; महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचं स्पष्टीकरण..

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

PM मोदी नाही तर हा युवानेता करणार राहुल गांधींसोबत डिबेट? रायबरेलीशी आहे थेट कनेक्शन

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

IPL 2024 प्लेऑफपूर्वी गंभीरच्या कोलकाताला मोठा धक्का, स्टार सलामीवीरने अचानक सोडली संघाची साथ

SCROLL FOR NEXT