Heaps of pending cases in the consumer forum 
अहिल्यानगर

ग्राहकांच्या न्यायाला उशिर ः कन्झ्युमर फोरममध्ये पेंडिंग प्रकरणांचे ढीग

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः ग्राहकांचेही हित जपले जावे, त्याच्यावर अन्याय होऊ नये किंवा त्याची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने तरतूद केली आहे. ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच न्यायनिवाडा करतात. मापात फसवणे, एखादा चेक न वटणे, अगदी साधी वाटणारी प्रकरणेही तुम्ही न्याय मंचाकडे निवाड्यासाठी मांडू शकता.

गेल्या काही वर्षांपासून तक्रारींचा निपटाराच होत नाही. निवाड्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. २० ते २५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.

नगर जिल्ह्यात १ हजार ४२५, औरंगाबादेत १०९७, जळगावात ३६६६, कोल्हापुरात १७७४, मुंबईत २३१४, पुण्यात १९७१, सोलापुरात १६५१, साताऱ्यात १०३५ प्रकरणे प्रलंबित आहेत.

कशाबाबत असतात तक्रारी

फायनान्स, विमा, घराबाबत, इलेक्ट्रीकल्स, टेलिकॉम, शिक्षण, वाहतूक, शेतपिकात फसवलेल्या गेलेल्या ग्राहकाला किंवा शेतकऱ्याला न्याय मागता येतो. चेकमध्ये फसवणूक झाल्यासही दाद मागता येते.

जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास
अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल भाषण केले होते.ग्राहक हक्कांबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक दिन हा आतंरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो.

काय आहे संकल्पना

ग्राहकांची फसवणूक होते. परंतु याबाबत न्याय मागता येतो, याचा सर्वसामान्य लोकांना थांगपत्ताही नसतो. परंतु ग्राहकमंचाचा दरवाजा ठोठावता येतो. अगदी अॉनलाईन मागितलेली वस्तू खराब निघाल्यास आणि कंपनीने तिची भरपाई किंवा बदलून न दिल्यास दाद मागता येते. १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहकाचे हित जोपासले जावे यासाठी हा दिन असतो.

एखाद्या मालाचा दर्जा, शुद्धता, क्षमता, मानक, किंमतीबद्दल माहिती मिळवण्याचा अधिकारी कायद्याने मिळाला आहे. हल्ली अॉनलाईनही तक्रारी करता येतात.त्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे प्रकरणे पेडिंग राहतात, असे अधिकारी सांगतात.

भारतात २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक असतो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 

  • हा आहे उद्देश
  • सुरक्षेचा हक्क
  • माहितीचा हक्क
  • निवड करण्याचा अधिकार
  • म्हणणे मांडण्याचा हक्क
  • तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
  • ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार
  • ग्राहकांना मदत

ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच, www.nationalconsumerhelpline.in या वेबसाइटवरही तक्रारी नोंदवल्या जातात. तक्रारीबाबत सर्व माहिती तेथे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT