कर्जत: तो कधी येतो कधी येतो अशी आस शेतकरी वर्गासह सर्वांनाच लागली होती. काल आणि आज पावसाचे धुमधडाक्यात तालुक्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाले. मात्र, तालुक्यातील चापडगाव येथे अद्यापि हुलकावणी देणाऱ्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसात नदीनाले एक करीत गावालगत असलेला साठवण बंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला.
मृग नक्षत्र सुरू झाले आणि तालुक्यात आभाळ भरून यायचे, मात्र पाऊस पडत नव्हता. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्या ओलीवर शेतकऱयांनी खरिपातील कपाशी, बाजरी, तूर, मका, उडदासह विविध पिकांची पेरणी केली. मात्र, त्या नंतर सुमारे आठवडाभर विश्रांती घेत काल पावसाने तालुक्यात हजेरी लावली. तालुक्यात सर्व ठिकाणी थोड्या फार प्रमाणात पाऊस पडला असला तरी चापडगाव सह परिसरात मात्र सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला.
हेही वाचा - कोरोनाच आजही नगरकरांना हिसका
वारा नसल्याने कुठले नुकसान न होता गावालगत असलेले जलसंधारण कामातील पाझर तलाव पन्नास टक्के भरले. मात्र, गावालगत चौंडी रस्त्याच्या बाजूस असलेला तरवडी साठवण बंधारा मात्र पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला. अनेक महिन्यांनंतर हे अनोखे नयनमनोहर दृश्य ग्रामस्थांनी डोळ्यात साठविले. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळण्याबरोबर कोरड्या ठाक पडलेल्या विहिरी आणि कूपनलिका यांचे पाण्याचे स्त्रोत बळकट होत पाणी फुटून काही कालावधीसाठी पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल.
तालुक्यातील मंडळनिहाय काल आणि कंसात एकूण नोंद मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.