bhingar
bhingar  
अहमदनगर

Video : येथे भरतो कोरोनाचा आठवडे बाजार 

दत्ता इंगळे

नगर तालुका : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध भागातील भाजीबाजार जिल्हा प्रशासनाने बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र अहमदनगर छावणी परिषदेच्या वरदहस्तामुळे भिंगारमधील कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मोठा आठवडे बाजार भरत आहे. या बाजारात सोशल डिस्टन्सच्या नियमांची पायमल्ली सुरू आहे. त्यामुळे आठवडे बाजार कोरोना बाजार होईल असा धोका स्थानिक नागरिकांना वाटू लागला आहे. 

देशात लॉकडाउन जाहीर होताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात आठवडे बाजार भरविण्यास मनाई केली आहे. शहरातील मुख्य चौकांत स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सोशल डिस्टन्स संदर्भातील नियमांचे पालन करून भाजीपाला व फळे विक्री करण्यास परवानगी दिली जाते. भिंगार शहरातील बाजारतळावर दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. मात्र लॉकडाउनमुळे आठवडेबाजार बंद करण्यात आलेला आहे.

आठवडेबाजारात काही विक्रेत्यांना जागा आखून दिलेल्या असल्या तरी त्या ऐवजी हे भाजीविक्रेते सध्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील पंचशिलनगर कमानीपासून आलमगीर रस्त्यापर्यंत बसतात. हा रस्ता वर्दळीचा व चौपदी असला तरी भिंगार हद्‌दीतील रस्त्याच्या चौपदी करणाचे काम झाले नसल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी असते. 

आजही या रस्त्यावर शुक्रवारचा आठवडे बाजार भरलेला होता. या बाजारात सुमारे 300 भाजीविक्रेते भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी बसले होते. भाजीविक्रेते व ग्राहक कोणत्याही सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. भाजीविक्रेत्यांकडून छावणी परिषद कर स्वरूपात 40 रुपये घेत आहे मात्र पावत्या त्यांना दिल्या जात नाहीत. काही भाजीविक्रेते छावणी परिषदेच्या हद्दीत तर काही विक्रेते ग्रामीण भागाच्या हद्दीत बसलेले असले तरी सर्व भाजीविक्रेत्यांकडून छावणी परिषद शुल्क आकारणी करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

पोलिसांचे संख्याबळ झाले कमी 
सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करते. मात्र सध्या राज्य शासनाच्या गृहविभागाने 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना कामावर न येण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचे संख्याबळ कमी झाले आहे. त्याचा परिणाम पोलिसांच्या कारवाईवर दिसून येत आहे. 

 
अहमदनगर छावणी परिषदेच्या वरद हस्तामुळे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरला आहे. भिंगारमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास अथवा या रस्त्यावर अपघात होऊन जीवित हाणी झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. 
- मतीन सय्यद, राष्ट्रवादी युवक जिल्हा शहर संघटक. 

 

रस्त्यावर भरणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर पोलिस सतत कारवाई करत असते. मात्र सध्या पोलिस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अपुरे आहे. भाजीविक्रेत्यांसंदर्भात अहमदनगर छावणी परिषदेने तक्रार केल्यास कारवाई करण्यात येईल. 
- प्रवीण पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे. 


छावणी परिषदेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर ग्रामीण भागातून येणारे भाजीविक्रेते भाजीपाला व फळांची विक्री करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश छावणी परिषद प्रशासनाला दिलेले आहेत. 
- विद्याधर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर छावणी परिषद, भिंगार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT