Hope to fill up the dam soon this year 
अहिल्यानगर

यंदा आबादीआबाद.. या कारणामुळे भरणार धरणे लवकर

सतीश वैजापूरकर

शिर्डी : पाणलोट क्षेत्रात मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वीच यंदा भंडारदरा धरणात 33, निळवंडे धरणात 43, तर दारणा धरणात तब्बल 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सरासरीएवढा पाऊस झाला, तरी दर वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळ्यात भंडारदरा धरण जुलैअखेरीस भरेल, असा जाणकारांचा कयास आहे. वादळामुळे आलेल्या पावसाचा बोनस मिळाल्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात तुलनेत पाण्याची मागणी घटली आहे. एरवी सिंचन व्यवस्थेवर येणारा ताण या पावसाने कमी केला. जलद कालव्यासह दोन्ही गोदावरी कालवे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. 

सध्या सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनासाठी गोदावरी व जलद कालव्याचे आवर्तन मिळून दारणा धरणात चार टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सर्वत्र 50 ते 75 मिलिमीटर पाऊस झाल्याने, पाण्याच्या मागणीत बऱ्यापैकी घट झाली. त्याचा परिणाम म्हणून पाण्यासाठी होणारी शेतकऱ्यांची ओरड कमी झाली. सिंचन व्यवस्थेवरचा ताण कमी झाला. 

भंडारदरा, निळवंडेत 7 टीएमसी पाणी 

भंडारदरा धरणात 33 टक्के, तर निळवंडे धरणात 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याचा अर्थ असा, की भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वीच साडेतीन हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा असेल. पाऊस येण्यापूर्वीच 30 टक्के पाणीसाठा शिल्लक राहील. पावसाने वेळेवर हजेरी लावली, तर दर वर्षीच्या तुलनेत हे धरण महिनाभर आधी भरेल. निळवंडे धरणात 43 टक्के पाणीसाठा आहे. दोन्ही धरणांत मिळून सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. पाणलोट व लाभक्षेत्रात मागील वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने निळवंडे धरणातून प्रवरा कालव्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त आठ टीएमसीपैकी केवळ एक टीएमसी पाण्याचा वापर करता आला. उर्वरित पाणी तसेच शिल्लक राहिले. 

जायकवाडीत 36 टक्के पाणीसाठा 

दिलासा देणारी बाब अशी, की मराठवाड्यातील जायकवाडी धरणातदेखील 28 टीएमसी म्हणजे 36 टक्के पाणीसाठा आहे. सरासरीएवढा पाऊस झाला, तरी वरच्या बाजूची धरणे लवकर भरतील आणि उर्वरित पाणी जायकवाडीकडे जाऊ शकेल. वरील बाजूच्या धरणांत पाणी साठविण्यासाठी तेथे केवळ 22 टीएमसी अतिरिक्त पाण्याची गरज भासेल. 

तिन्ही कालवे वाहत आहेत

मराठवाड्यात जाणारा जलद कालवा व गोदावरी कालव्यांसाठी दारणा धरणात चार हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा ठेवला आहे. वरील बाजूची भाव, भावली व वाकी ही धरणे जवळपास रिकामी आहेत. कालव्यांच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. तिन्ही कालवे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. 
- सागर शिंदे, कार्यकारी अभियंता, नाशिक जलसंपदा विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT