This is how she celebrated her birthday at Sai's temple 
अहिल्यानगर

साईदर्शनास मनाई असतानाही तिने मंदिरात असा सेलिब्रेट केला बर्थ डे

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : आपल्या वाढदिवसानिमित्त साईबाबांच्या चावडीमध्ये शिरून शिवप्रिया नामक महिलेने दर्शन घेतले. गुरुवारी (ता. 25) घडलेल्या या घटनेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे प्रसारित केले. त्यानंतर साई संस्थानच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली.

त्यानंतर या प्रकरणी साईबाबा संस्थानाने दिलेल्या तक्रारीनंतर या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लॉकडाउनमुळे साईबाबा मंदिर आणि परिसरातील द्वारकामाई, चावडी, मारुती मंदिर अशा ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी प्रवेश करण्यास 17 मार्चपासून मनाई आहे. या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करत बॅरिकेडिंग केले आहे. मात्र, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास या महिलेने तिच्या वाढदिवसानिमित्त साईबाबांच्या चावडीत प्रवेश केला.

आत जाऊन तिने चावडीतील साईंच्या फोटोजवळ फोटोसेशन केले. बाहेर येऊन सोशल मीडियावर "आपण लॉकडाउनमध्ये चावडीत जाऊन दर्शन घेतल्याचे' तिने जाहीर केले. तोपर्यंत संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेला या घटनेचा थांगपत्ता नव्हता.

"सुरक्षारक्षक पाच मिनिटे बाहेर गेल्याने आपल्याला ही संधी मिळाली' असेही तिने त्यात जाहीर केले. या दर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल साइटवरून अपलोड केले.

या प्रकाराच्या विरोधात आज येथील कार्यकर्ते नितीन अशोक कोते, विकास गोंदकर, किरण कोते, अभिजित कोते, मंगेश उगले आदींनी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन दिले. 

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT