The hunger strike of 22 positive prisoners in Sangamnera 
अहिल्यानगर

संगमनेर कोठडीतील २२ पॉझिटिव्ह कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन...हे आहे कारण

आनंद गायकवाड

संगमनेर : शहरातील कारागृहातून राहुरीला हलविलेल्या दोन कैद्यांचा अहवाल कोरोनाबाधित आला. त्यामुळे प्रशासनाने तीन कोठड्यांमधील 46 कैद्यांची 29 जुलै रोजी रॅपीड अँटीजेन चाचणी केली. त्यात तब्बल 22 कैदी कोरोनाबाधीत आढळले.

या बाधित कैद्यावर संगमनेर कारागृहातच उपचार सुरू होते. मात्र, आपणास रुग्णालयात दाखल करावे या मागणीसाठी कैद्यांनी रविवार दुपारपासून सुरु केलेले अन्नत्याग आंदोलन अद्यापही सुरु आहे.

या कैद्यांना तेंव्हापासून वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर नियमित उपचारही करीत होते. मात्र त्यातील काहींनी रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले.

या कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी न झाल्याने त्यांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्याचे ठरले होते.

रविवारी ( ता. 02 ) च्या रात्री रुग्णवाहिकेसह मोठा बंदोबस्तही संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. मात्र पॉझिटिव्ह आलेल्या बंदीवानांमधील काहीजण गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला.

राहुरी कृषी विद्यापीठातील कोविड सेंटरसह राहुरी पोलिसांनीही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नाकारल्याने, त्यांना राहुरीला पाठविण्याचा निर्णय स्थगित करावा लागला. या कैद्यांची जबाबदारी कोणी घ्यावी यावर घोडे अडल्याने, अहवाल प्राप्त झाल्यापासून पाच दिवस उलटूनही हे सर्व बंदीवान अद्यापही कारागृहातच आहेत.

या 22 पैकी दोघांचा जामीन मंजूर झाल्याने त्यांना तात्काळ मुक्त करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत वीस जणांवर कारागृहातच उपचार सुरु आहेत. त्यांचा विलगीकरणाचा कालावधीही जवळपास संपल्याने, त्यांना अन्यत्र हलवण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT