The husband took this step after seeing him with his wife 
अहिल्यानगर

त्याला बायकोसोबत पाहताच नवऱ्याने उचललं हे पाऊल

संजय आ. काटे

श्रीगोंदे : (अहमदनगर) तालुक्‍यातील म्हातारपिंप्री येथे नाजूक संबंधातून कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे, खुनानंतर आरोपी स्वत:हून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात हजर झाला. नरेंद्र सयाजी वाबळे (वय 50), असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आज सायंकाळी एक जण पोलिस ठाण्यात आला. "मी खून केला,' असे सांगू लागला. मात्र, त्याच्यावर लगेच विश्वास कसा ठेवणार? त्यामुळे पोलिस त्याची कसून चौकशी करू लागले.

खून करून मृतास उसाच्या शेतात टाकल्याचे आरोपी सांगत असला, तरी पोलिसांना खरे काय ते समजत नव्हते. पोलिस निरीक्षक दौलत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावीत यांनी वाहनातून नेऊन त्याला घटनास्थळ दाखवायला सांगितले असता तो तयार होईना.

शेवटी पोलिसांनी त्याला वाहनात बसवून तो सांगत असलेल्या ठिकाणी नेले. त्या वेळी उसाच्या शेतात एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. 

पोलिस निरीक्षक जाधव म्हणाले, की आरोपी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. आरोपीने सांगितल्यानुसार, त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने वाबळे यांचा खून केल्याचे त्याचे म्हणणे आहे. या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT