An idol of Lord Mahadev will be erected on the bank of Vincharan river near the entrance of Jamkhed.jpg 
अहिल्यानगर

जामखेडच्या विंचरणेत आवतरणार भगवान शिवशंकर ; आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून होतेय पुन्नर्जीवन

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : लोकप्रतिनिधीने ठरविले तर काय बदल घडू शकतो याचे उत्तम उदाहरण जामखेडमधील विंचरणेचे आणि धाकल्या नदीचे बदलेले रुप पाहिल्यावर दिसते. शासनाच्या एक दामही न घेता हा बदल घडतोय. याकरिता आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताईंनी अथक परिश्रम घेतले. माझं शहर सुंदर, स्वच्छ शहर याकरिता हे काम सुरु आहे. नागरिकांनी उदासिनता जटकून कामाला लागावे यासाठी 'अधी केले मग सांगितले' हे तत्व अंगीकारून माय-लेकाचे काम सुरु आहे. जामखेडच्या प्रवेशद्वाराजवळ विंचरणानदीच्या तिरावर दगडी चबुतरा उभारुन त्याठिकाणी शिवशंकराच्या शिल्पाची प्रतिष्ठापना मोठ्या दिमाखदार सोहळ्याने होणार आहे.

श्री क्षेत्र गहिनीनाथाच्या पाया जवळून उगमस्थान असलेली विंचरणा चिखली ता.पाटोदा जि.बीड येथून वाहते. पुढे श्री क्षेत्र रामेश्वर सौताडा ता.पाटोदा येथे येवून विसावते. येथे प्रभुरामचंद्र आणि सीता मातेच्या पदस्पर्शाने आपलं पावित्र्य कायम टिकवते. पुढे हजारो जामखेडकरांची तृष्णा भागून स्वतःचा मोठेपणा जपते. मात्र पुढे स्वतःचे अस्तित्वच हरवून बसते. आणि पुढे जाऊन गटारगंगा बनते. वेड्या बाभळी, वेगवेगळ्या वेली, दुर्गंधी सुटलेले गटारीच्या पाण्याची डबकी यामुळे गावच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतः चा धर्म हरवून बसते. हे आमदार रोहित पवारांच्या लक्षात आले आणि त्यांनी विंचरणेचे हरवलेले अस्तित्व पुन्हा मिळवून देण्याचा व तिचे पावित्र्य विधीवत पुजनाने जपण्याचा निर्णय घेतला.

नदी सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. त्यावेळी पहिल्या टप्प्यात विंचरणा आणि धाकली नदी स्वच्छ, सुंदर आणि वहाती झाली. ऐवढ्यावरच न थांबता विंचरणेचे पावित्र्य कायम टिकावे याकरिता त्यांच्या संकल्पनेतून नदी तिराव शिवशंकराच्या शिल्पाची प्रतिष्ठापना दिमखदार सोहळ्याने होत आहे. हा सोहळा दोन दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना आणि दुसऱ्या दिवशी महापूजा व महाप्रसाद असा हा सोहळा असणार आहे.

नगरचे प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी साकारले शिल्प

विंचरणा नदी पात्रात भव्य दिव्य अशी भगवान शिवशंकराची 21 फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत वेदांतचार्य पांडुरंग शास्त्री देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजा पठनाने होणार आहे. हा देखना सोहळा रविवारी (ता.14 )रोजी होत असून महापूजा व महाप्रसाद सोमवार (ता.15) रोजी होणार आहे. यामुळे शहराच्या वैभवात भरच पडणार आहे. ही शंकराची मूर्ती बोलकी असून नगरचे प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी गेली काही महिन्यांपासून अथक परिश्रम घेऊन साकारली आहे. शुक्रवारी (ता.12) रोजी ही मूर्ती जामखेडला आणणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने साकारणार विकास कामे

दोन्ही नद्यांचे सुशोभीकरण करून शहराची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात कोठेही बाग नाही, यामुळे नदीच्या परिसरात बाग तयार करण्यात येणार आहे. तसेच नदीच्या दोन्ही बाजूला मोठे भराव टाकून नागरिकांना येण्याजाण्यासाठी रस्ता तसेच कडेने वृक्षारोपण केले जाणार आहे. पेव्हिंग ब्लाॅकही बसविण्यात येणार आहेत. 

जामखेड तालुक्यातील शिवालय भाविकांच्या समोर येणार

यानिमित्ताने जामखेड तालुक्यात असलेले जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर, चौंडी येथील चौंडेश्वर, जवळा येथील जवळेश्वर, आरणगाव येथील आरणेश्वर, पाटोदा येथील संगमेश्वर, साकत येथील साकेश्वर तसेच पुरातन वास्तुशास्राचा उत्कृष्ट नमुना ठरलेले इतिहासकालीन खर्डा परिसरात प्रतिष्ठापना केलेले बारा प्रतिज्योर्तिंलिंगाचे शिवमंदिरे ही ठळक नकाशावर येणार हे मात्र निश्चित..! धार्मिकतेची कास धरुन तालुक्याच्या पर्यटनाला चालणा मिळावी यासाठी हा प्रयत्न यशस्वी ठरणार, हे मात्र निश्चित.!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Atpadi Nagaradhyaksh Result: आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

SCROLL FOR NEXT