If you are getting married, then read these rules 
अहिल्यानगर

लग्न करताय मग ही नियमावली वाचाच... वऱ्हाड करावं लागणार क्वारंटाइन

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढू लागली. विवाहात 50 व्यक्तींच्या मर्यादेचे उल्लंघन घडू लागले. त्यामुळे, तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर यांनी विवाह सोहळ्याच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आदेश निर्गमित केले.

यापुढे ज्यांच्या घरी लग्न सोहळा आहे. त्यांनी लेखी अर्ज करून, विवाहात उपस्थितांच्या यादीसह करोना विषयक निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याचे हमीपत्र देणे बंधनकारक केले आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.

तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हंटले की, "ज्यांच्या घरात लग्न आहे. त्यांनी स्थानिक कोरोना ग्राम दक्षता समितीची परवानगी घ्यावी. पन्नासपेक्षा जास्त व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. याचे हमीपत्र द्यावे. विवाहास उपस्थित राहणाऱ्या 50 व्यक्तींची यादी द्यावी.

तपशीलासह करावा अर्ज

अर्जामध्ये विवाहाची तारीख वेळ व स्थळ नमूद करावे. विवाहासाठी बाहेरगावावरून येणार्‍या वऱ्हाडींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात थांबावे लागेल. विवाहाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण तपशिलासह नोंद नोंदवहीत घेण्यात यावी.

प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण नोंदविण्यात यावे. विवाह समारंभाचे चलचित्रीकरण (व्हिडिओ ग्राफी) करून त्याची एक प्रत व विवाहास उपस्थित राहिलेल्या व्यक्तींची यादी ग्राम दक्षता समितीकडे सुपूर्त करावी."

उल्लंघन केल्यास फौजदारी

"कोरोना ग्राम दक्षता समितीने चित्रीकरणाची तपासणी करून, 50 व्यक्ती पेक्षा जास्त जण विवाहास उपस्थित असल्याचे निष्पन्न झाल्यास तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. नगरपालिका क्षेत्रातील परवानगी करिता नगरपालिकेकडे अर्ज करावा.

मास्क आवश्यक

विवाहस्थळी सामाजिक सुरक्षेचे पालन केले जावे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने साबण व पाण्याने हात धुवावेत. प्रत्येकाने नाक व तोंडावर मास्क लावलेला असावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी." असेही आदेशात म्हंटले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT