If you put a mobile number on Facebook 
अहिल्यानगर

तुम्ही फेसबुकवर मोबाईल क्रमांक टाकलाय...तर होऊ शकतं असं

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः फेसबुक अकाऊंट हॅक करुन पैसे काढण्याचा प्रयत्न झाला. गावात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. बँक अकाउंट हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता फेसबुकही हॅक केले जात आहे. किंवा त्यावर अनेकजण मोबाईल नमूद करतात. त्या नंबरद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरमध्ये तसा प्रकार झाला आहे.

या बाबतची माहिती अशी, की तालुक्यातील बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांच्या मोबाईलवरील फेसबुक अकौंट अज्ञात व्यक्तीने हँक केले. मोबाईलमधील सर्व व्यक्तीचे मोबाईल क्रमांक मिळविले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी फेसबुकवरील नातेवाईकांना, मला पैशाची अंत्यंत गरज अाहे.

 तातडीने फोन पे वर या खात्यावर पैसे पाठवावेत, अशी विनंती करणारे संदेश (मेसेज) केले. मात्र, सदरचा संदेश हिंदी भाषेतून असल्याने गाडे यांच्या मेहुण्यांना संशय आला. त्यांनी अमोलशी संपर्क साधत विचारणा केली असता, मी पैसे मागितलेच नाही, असे अमोलने सांगितले. त्यानंतर मेहुण्याने मोबाईलमधील स्क्रीन शॉट काढून अमोलला पाठविला. 
या दरम्यान अमोलला एका व्यापार्यासह इतर मित्राचे फोन सुरु झाले. तुला अचानक पैशाची काय गरज पडली. या प्रश्नांची त्याच्यावर सरबत्ती झाल्यामुळे तो गोंधळून गेला. त्याने गुन्हा अन्वेषण शाखेचे रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी यांना या बाबत माहिती दिली. त्यांनी व्हाँटसअपवर सदरचा संदेश मागविला.

अशा प्रकारे चार-पाच जणाचे मोबाईल हॅक करण्याच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अमोल गाडे याने नगर येथील सायबर शाखेकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. गाडे यांच्याबरोबर घडलेली घटना इतर कोणाबाबत घडू शकते, त्यामुळे चौकशी व खात्री केल्याशिवाय कोणीही आर्थिक व्यवहार करु नयेत, असे अवाहन बेलापूर पोलीस चौकीचे हवालदार रामेश्वर ढोकणे यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT