अहिल्यानगर

नगरमध्ये रेशनचा काळाबाजार; धान्यसाठ्यांवर छापे

सकाळ वृत्तसेवा

हा छापा बाजार समिती व केडगाव येथे टाकण्यात आलेला आहे.

अहमदनगर : रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला सुमारे ४० लाखांचा अवैध धान्यसाठ्यासह वाहने कोतवाली. पोलिस व जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. १९) छाप्यात जप्त केले आहे. हा छापा बाजार समिती व केडगाव येथे टाकण्यात आलेला आहे. (in ahmednagar, ration wheat and rice are sold on the black market)

नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी अवैधरीत्या साठा करून ठेवल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संयुक्‍त पथकाने शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास बाजार समितीमधील सोहम ट्रेडिंग कंपनी, तसेच केडगाव औद्यागिक वसाहतीतील नर्मदा फ्लोअर मिलवर छापा घातला. पोलिसांनी या ठिकाणी मुद्देमाल हस्तगत करून, त्या ठिकाणी असलेली बिलांची तपासणीसुद्धा सुरू केली आहे. ही दोन्ही दुकाने ‘सील’ करण्यात आली आहेत.

या छाप्यात तांदूळ व गव्हासह सहा वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. सुमारे ४० लाख ९९ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल दोन्ही ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बाजार समितीतील पहिल्या छाप्यात सुरेश बबन रासकर, सागर अशोक नांगरे, आदिनाथ सुखदेव चव्हाण, भगवान हरिभाऊ छत्तिसे यांच्याविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव येथील छाप्यात गणेश श्रीनिवास झंवर, जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, संदीप कारभारी पागिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (in ahmednagar, ration wheat and rice are sold on the black market)

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT