including bjp Prakash dhokarikar four people from Karjat joined the ncp
including bjp Prakash dhokarikar four people from Karjat joined the ncp  Sakal
अहमदनगर

कर्जतमध्ये भाजपला धक्का; ढोकरीकर यांच्यासह 4 जण राष्ट्रवादीत

निलेश दिवटे

कर्जत (जि. नगर) : नगरपंचायतीची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले. या वेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील जाताच आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमधील भाजपचे प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे नगरपंचायत निवडणुकीपूर्वी भाजपला कर्जतमध्ये मोठा धक्का बसला आहे.


आमदार रोहित पवार हे कर्जतचा सर्वांगीण विकास करू शकतात. त्यांनी केलेल्या कामाने आम्ही प्रभावित झालो आहोत. स्वप्नातील कर्जत शहर उभे करण्यासाठी तसेच विकासाला साथ देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत, असे म्हणत या चौघांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा मार्ग धरला आहे. भाजपच्या अनेक निवडणुकांत कर्जतमध्ये प्रचारासह नेत्यांच्या सभा, मेळावे तसेच शासकीय कामाची बाजू प्रभावीपणे सांभाळण्यात जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांचा मोठा हातभार राहिला होता. त्यांच्यासह नगरसेवक लालासाहेब शेळके, देविदास खरात व नगरसेविका पूत्र नितीन तोरडमल यांनी आज आमदार रोहित पवार यांचे हस्ते व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे, उद्योजक संतोष नलवडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कालच्या तालुका दौऱ्यानंतर उद्या (ता. ३१) विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्‌घाटन सोहळ्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील कर्जतच्या दौऱ्यावर येत आहेत. नागरपंचायत निवडणूक उंबरठ्यावर असताना झालेल्या या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT