Increase of 165 corona virus patients in 24 hours in Nagar district
Increase of 165 corona virus patients in 24 hours in Nagar district 
अहमदनगर

नगर जिल्ह्यात २४ तासात १६५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

अशोक निंबाळकर

अहमदनगर : जिल्ह्यात २४ तासात १६५ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ रुग्णबाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

याशिवाय, अँटीजेन चाचण्यात बाधित आढळलेल्या ४१ रुग्णांची नोंद रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९१५ इतकी झाली असून रुग्ण संख्या २१९२ झाली आहे. दरम्यान, आज १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२३३ इतकी झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ तासात ४१ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये राहाता तीन (साकुरी), पारनेर चार (ढवळपुरी दोन, सारोळा आडवाई एक, किन्ही एक), श्रीगोंदा १३ (घोगरगाव चार, काष्टी एक, चिकलठाणवाडी एक, चाडगाव एक, कोळगाव एक, देवदैठण एक, घारगाव एक), पाथर्डी एक (सोनोशी), शेवगाव एक (मंगरूळ एक, शेवगाव शहर एक), श्रीरामपूर दोन, 
नगर ग्रामीण तीन, नगर शहर १३. याशिवाय, जलद गतीने कोरोना निदान करण्यासाठी आता अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आज ४१ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर नऊ, नेवासा १६, कोपरगाव दोन, संगमनेर १०, कॅन्टोन्मेंट एक, मनपा तीन अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

उपचार सुरू असलेले रुग्ण : ९१५
बरे झालेले रुग्ण : १२३३
मृत्यू : ४४
एकूण रुग्ण संख्या : २१९२
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT