Increasing number of corona patients in Ahmednagar 
अहिल्यानगर

कोरोनाचे दुखणे हाताबाहेर, नगरमध्ये बाधितांंचा आणि मृतांचा आकडा कमीच होईना

दौलत झावरे

नगर ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, बरे होण्याचा आलेखही उंचावत आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. आज दिवसभरात एकूण नऊ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर मृतांची संख्या 240 झाली आहे. मृत्यूचा आकडा शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्ह्यात दिवसभरात 486 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार 964 रुग्ण कोरोनातून ठणठणीत झाले आहेत. त्याची टक्केवारी 79.37 झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 519 कोरोनाबाधित आढळल्याने बाधितांची संख्या 17 हजार 583 झाली. सध्या रुग्णालयात 3389 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 91 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 61, संगमनेर एक, पाथर्डी 12, नगर ग्रामीण 11, श्रीरामपूर एक, कॅन्टोन्मेंट दोन, श्रीगोंदे एक, पारनेर एक व इतर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत जिल्ह्यात 283 बाधित सापडले. त्यात महापालिका हद्दीत 58, संगमनेर 17, राहाता 15, पाथर्डी 17, श्रीरामपूर दोन, कॅन्टोन्मेंट 16, नेवासे 11, श्रीगोंदे 32, पारनेर 8, अकोले 27, शेवगाव तीन, कोपरगाव 40, जामखेड 23 व कर्जतमधील 14 जणांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 145 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 93, संगमनेर चार, राहाता पाच, पाथर्डी एक, नगर ग्रामीण 14, श्रीरामपूर चार, कॅन्टोन्मेंट एक, नेवासे दोन, पारनेर चार, अकोले एक, राहुरी सहा, कोपरगाव पाच, जामखेड चार व कर्जतमध्ये एकाचा समावेश आहे. 


486 जण बरे 
जिल्ह्यातील 486 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यात महापालिका हद्दीत 171, संगमनेर 39, राहाता 39, पाथर्डी 25, नगर ग्रामीण 20, श्रीरामपूर 11, कॅन्टोन्मेंट 21, नेवासे 14, श्रीगोंदे 16, पारनेर 29, अकोले 13, राहुरी सात, शेवगाव 10, कोपरगाव 35, जामखेड 23, कर्जत आठ व मिलिटरी हॉस्पिटलमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT