Increasing support to Indorikar Maharaj
Increasing support to Indorikar Maharaj 
अहमदनगर

इंदोरीकर महाराजांना वाढता पाठिंबा.. वारकरी संघटना एकवटल्या 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्‍यातील वारकरी संघटना व सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर न्यायालयात दाखल केलेली फिर्याद खोटी असून, ती त्वरित मागे घेण्याची मागणी अकोले तालुका वारकरी संघटनेने तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे केली. 

निवेदनात म्हटले आहे, की तालुक्‍यातील या भूमिपूत्राने अकोल्याचा नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचविला. मात्र, समाजातील नास्तीक विचारांच्या लोकांनी शाब्दिक दोष काढुन, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने खोटी फिर्याद दाखल केली. 

अशी घटना लांच्छनास्पद

साधू-संताचा इतिहास व विचाराची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशी घटना लांच्छनास्पद आहे. अकोले तालुका वारकरी संघटना व सर्व वारकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. वारकरी संघटनेचे मार्गदर्शक विवेक महाराज केदार, कार्याध्यक्ष शांताराम महाराज पापळ, अरुण महाराज शिर्के, सचिव कैलास महाराज आहेर आदी उपस्थित होते. 

व्यापक आंदोलनाचा इशारा 

देशमुख महाराजांविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली खोटी फिर्याद मागे न घेतल्यास, समस्त वारकऱ्यांतर्फे व्यापक आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. सोमवारी (ता.27) अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व अकोल्याचे प्रथम नगराध्यक्ष ऍड. के. डी. धुमाळ, वारकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व देवस्थानचे विश्वस्त दीपक महाराज देशमुख, रोटरी क्‍लबचे संस्थापक अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, अध्यक्ष सचिन शेटे, ज्ञानेश्वर आरोटे, विनेश देशमुख, दत्ता अस्वले आदींनी तहसीलदार कांबळे यांनी निवृत्ती महाराज देशमुख यांच्या पाठिंब्याबाबत निवेदन दिले. 


संगमनेरातील समर्थकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा 

संगमनेर : समाजासाठी कोणतेही योगदान नसलेल्या, हिंदू धर्म संपुष्टात आणणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींनी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी दिला आहे. तसे निवेदन तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आले. 

समाजसुधारकांना संपविण्याचा प्रयत्न 

निवेदनात म्हटले आहे, की इंदोरीकर महाराजांच्या विरोधात चुकीची व खोटी केस दाखल करणे हा हिंदू धर्मावर केलेला हल्ला आहे. ऋषीमुनी, साधूसंतांनी धर्मग्रंथ व संहितेत लिहिलेले दाखले महाराजांनी कीर्तन-प्रवचनाद्वारे दिले. आपल्या कीर्तन व प्रवचनातून वाईट मार्गाला गेलेले युवक व लोकांना त्यांनी कीर्तनात बसविले. समाज सुधारत असताना, अशा प्रकारे गुन्हा दाखल करून हिंदू धर्मातील कीर्तनकार, प्रबोधनकार, समाजसुधारकांना संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. 

हिंदू धर्म संपविण्यासाठी खोटे खटले 

सुमारे 25 वर्षांपासून इंदोरीकर महाराज अध्यात्म, कीर्तन, प्रवचनातून समाज सुधारण्याचे काम करीत आहेत. शैक्षणिक कार्यातून गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूरांच्या तीनशेहून अधिक मुला-मुलींचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन काळात गरजूंना जीवनावश्‍यक वस्तू, अन्नधान्यांचे मोफत वितरण केले. मात्र, समाजासाठी कुठलेही योगदान नसलेल्या व हिंदू धर्म संपविण्यासाठी खोटे खटले दाखल केलेल्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करतो.

हा गुन्हा मागे न घेतल्यास, इंदोरीकर महाराज समर्थक रस्त्यावर उतरतील, असा इशारा निवेदनात दिला आहे. अहमदनगर जिल्हा वारकरी परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश महाराज सोनवणे, विशाल महाराज तिकांडे, सागर महाराज टिपरे, सचिन महाराज मापारी, सुनील महाराज मंगळापुरकर आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT