https://www.esakal.com/ahmednagar/independent-panel-women-teachers-bank-elections-challenged-incumbents-417073
https://www.esakal.com/ahmednagar/independent-panel-women-teachers-bank-elections-challenged-incumbents-417073 
अहमदनगर

शिक्षक बँक निवडणुकीत महिलांचे स्वतंत्र पॅनल, प्रस्थापितांना दिले चॅलेंज

मार्तंड बुचुडे

पारनेर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा संचालक मंडळाचा कार्यकाल संपला आहे. लवकरच शिक्षक बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील महिला साजिर मंडळाच्या रूपाने निवडणुकीसाठी संपूर्ण ताकदीने उतारणार आहे. 

मंडळाच्या अध्यक्ष मीनल शेळके यांनी तसे जाहीर केले आहे. महिला सभासदांना उमेदवारी देऊन बँकेचा कारभार सभासद हिताचा करण्यासाठी व शिक्षकांची समाजात पत निर्माण करणेसाठी महिला उमेदवार उभे करण्या येणार आहे. हे मंडळ सावित्री, जिजाऊ, रमाई यांच्या विचारांचा वारसा घेऊन सर्व जागांसाठी महिला उमेद्वार देऊन निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असेही शेळके यांनी पत्रकात म्हटले आहे.

बँकेची स्थापना होऊन एकशे एक वर्ष पूर्ण झाली परंतु निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याच मंडळाने संपूर्ण महिलांचे मंडळ उभे करण्याचे धाडस केले नाही. कायमच बँकेच्या कारभारात भ्रष्टाचाराचे गालबोट संचालकांना लागले आहे. वार्षिक सर्वसाधरणसभेत हाणामारी, अंडे फेकणे, चपला फेकणे, गोंधळ करणे यामुळे सर्वसामान्य सभासदांची बदनामी तर झालीच झाली पण काही सभासदांना तुरुंगाची देखील हवा खावी लागली आहे .

या सर्व प्रकारास सर्वसामान्य सभासद व महिला भगिनी कंटाळून सभेला उपस्थिती दाखवण्याचे टाळत होत्या. या साठी हे सर्व अनिष्ट प्रथा, गोंधळ बंद होऊन समाजात शिक्षकाची मान उंचावेल यासाठी साजिर महिला मंडळ निवडणुकीत भाग घेणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

२१ महिला उमेदवार

आजपर्यंत बँकेच्या संचालकपदासाठी उमेद्वारी देताना पैशाचा वापर झाला आहे. प्रचार, मेळावे व जेवणावळी यावर लाखो रुपये खर्च होतात व हा खर्च सत्ता आल्या नंतर वेगवेगळे घोटाळे करुन वसूल करतात. या सर्व गोष्टींना तिलांजली देण्यासाठी साजिर मंडळ इच्छुक महिलांमधुन सोडत पद्धतीने उमेदवारी देऊन 21 महिला उमेदवार उभ्या करून निवडणुक लढविणार आहेत.

पत्रकावर रोहिणी गायकवाड, ज्योती साबळे, सुलोचना तिकोने, वृषाली शिंदे, अलका काकडे , लंका गाडीलकर, सुचित्रा जाधव, सुचिता झावरे, मनिषा शिंदे, निर्मला वैद्य, ललिता पठारे, शोभा गायकवाड, कल्पना साबळे, विद्यादेवी सुंबे, मंजुश्री शिंदे, सविता वाघस्करआदी महिला सदस्यांच्या सह्या आहेत.

कर्जावरील व्याज ९ टक्के तेही स्थिर

साजिर मंडळ निवडून आल्यानंतर कर्जावरील व्याजदर पाच वर्षांसाठी नऊ टक्के करून तो स्थिर ठेवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड सर्वसाधारण सभेतच सोडत पद्धतीने सर्वांसमोर काढली जाणार आहे. सर्वांना संधी देण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT