स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार sakal
अहिल्यानगर

स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार : डौलाने फडकावला तिरंगा

स्वातंत्र्यरूपी उषःकालाचं स्वागत करण्यासाठी मध्यरात्री हजारो नागरिक दाणेडबऱ्यात जमले होते....

सकाळ वृत्तसेवा

-कमलताई आपटे, स्वातंत्र्यसैनिक, नगर

स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या...ज्या सोनेरी क्षणाची सगळे नगरकर आतुरतेने वाट पाहात होते तो समीप आला होता. घरापुढे सडासंमार्जन करून रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. झिरमिळ्या आणि कमानींनी शहर सजलं होतं. स्वातंत्र्यरूपी उषःकालाचं स्वागत करण्यासाठी मध्यरात्री हजारो नागरिक दाणेडबऱ्यात जमले होते.... मध्यरात्री बाराचे ठोके पडल्यानंतर नगरचे सुपुत्र, थोर देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते नगरच्या दाणे डबरा भागात ध्वजवंदन झालं. महिलांच्या वतीने झेंडा फडकवण्याचा मान मिळाला मला मिळाला.. तो क्षण आठवताच अंगावर आजही रोमांच उभे राहातात... ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलताई आपटे आठवणी सांगत होत्या...

१९४२ च्या लढ्यात कारावास भोगलेल्या कमलताई आपटे ९६ वर्षांच्या आहेत. पहिल्या झेंडावंदनाचा तो क्षण त्यांनी स्मरणकुपीत जपून ठेवला आहे. त्या म्हणाल्या, त्या दिवशी गांधी मैदानातून निघालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी पंचारती घेतलेल्या १५० सुवासिनी होत्या. माझ्या सासूबाईंनी स्थापन केलेल्या बालिकाश्रमातील मुलीही यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशभक्तिपर गाणी त्या म्हणत होत्या. त्यांच्यामागे सुमारे चारशे नागरिक शिस्तीने रांगेत चालले होते. मिरवणूक पुढे निघाली, तसे आणखी दोन-तीन हजार नगरकर त्यात सहभागी झाले.

मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. चले जाव आंदोलनात नगरच्या भुईकोट किल्ल्यात कारावास भोगलेले राष्ट्रीय नेते नरेंद्र देव हे स्वातंत्र्य दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. रावसाहेब पटवर्धन हे नरेंद्र देव यांना घेऊन येताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं. बारा वाजल्यानंतर रावसाहेब आणि माझ्या हस्ते स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकविण्यात आला. तो क्षण डोळ्यात साठवताना आनंदाच्या ऊर्मी मनात उसळत होत्या. स्वतंत्र भारताचा जयजयकार सुरू असतानाच सुवासिनींनी आपल्या हातातील पंचारतींनी नेत्यांना ओवाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT