Infection in the family due to corona infections, all three reported positive 
अहिल्यानगर

कोरोना बाधितांमुळे कुटुंबाला लागण, तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नगर ः घाटकोपर येथून मूळ गावी जात असताना मुंबईतील पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नीला त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिचा कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

नगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची 22 वर्षीय मुलगी व सुभेदार गल्लीतील महिलेच्या संपर्कातील 20 वर्षीय युवकालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 64 झाली आहे. 
कोरोनाबाधित घाटकोपरची महिला व तिचा पती मूळ गावी पाथर्डी तालुक्‍यात जात होते.

नगरमध्ये आल्यावर महिलेला सर्दी, खोकला, ताप असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली. तपासणीत ती बाधित असल्याचे आढळले. तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला. 
सारसनगर येथील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी (ता. 13) स्पष्ट आले होते. त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या घशातील स्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात या व्यक्तीच्या मुलीलाच कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय, दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेल्या सुभेदार गल्लीतील वृद्ध महिलेच्या संपर्कातील, याच गल्लीतील एका युवकाचा अहवालही आज पॉझिटिव्ह आला. आज एकूण 26 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात हे तिघे बाधित आढळून आले. उर्वरित 23 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

पारनेरमधील नऊ जण निगेटिव्ह 
पारनेर ः कोरोनाने मृत्यू झालेल्या तालुक्‍यातील व्यक्तीच्या पत्नीसह त्याच्या संपर्कातील नऊ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ते सर्व अहवाल आज निगेटीव्ह आले आहेत. 
 
कोरोना मीटर 

  • 1819 व्यक्तींची तपासणी 
  • 64 पॉझिटिव्ह 
  • 1718 निगेटिव्ह 
  • 50 निरीक्षणाखाली 
  • 509 होम क्वारंटाईन 
  • 01 अहवाल येणे बाकी 
  • 40 रुग्णांना डिस्चार्ज 
  • 05 जणांचा मृत्यू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT