Inspector General of Police Dighavakar called on Anna Hazare 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध, महानिरीक्षक दिघावकरांची अण्णांना माहिती

मार्तंड बुचुडे

पारनेर ः नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी काल दुपारी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी दीड तास शेतीसह सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली. त्यावर हजारे यांनी दिघावकर यांच्यासह पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचेही कौतुक केले. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची समाजाला गरज असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. 

दिघावकर यांनी काल दुपारी हजारे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत पोलिस अधीक्षक पाटील उपस्थित होते. दिघावकर म्हणाले, ""नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यापारी फसवणूक करीत. शेतमालाचे दिलेले धनादेश वटत नसत. बहुतेक शेतकरी पोलिसांत येत नाहीत. त्यातून त्यांची मोठी फसवणूक होत होती. ही बाब समजल्यावर अशा हजारो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे लाखो रुपये मिळवून दिले.'' 

हजारे म्हणाले, ""तुमच्यासारखे अधिकारी देशाला मिळाले, तर उज्ज्वल भविष्य निर्माण होईल. तुमचा आदर्श इतर तरुण अधिकाऱ्यांनी घ्यावा.'' या वेळी हजारे यांनी अधीक्षक पाटील यांच्याही कामाचे कौतुक केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT