Farmer doughter
Farmer doughter  
अहमदनगर

Inspirational : शेतकऱ्याच्या लेकींची गगणभरारी! दोघी सख्ख्या बहिणींची पोलिस दलात निवड

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव - तालुक्याच्या शहापूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गायत्री बाबासाहेब घारे आणि अश्विनी बाबासाहेब घारे या भगिनींनी कठोर परिश्रम घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश मिळवले.

ग्रामीण भागातील मुलींमध्येही गुणवत्ता व टॅलेंट आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गायत्री व अश्विनी घारे यांची पोलिस कॉन्स्टेबलपदी झालेली निवड तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे त्यांनी सार्थक केले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले.

गायत्री घारे आणि अश्विनी घारे या दोघी शहापूर (ता. कोपरगाव) येथील शेतकरी बाबासाहेब घारे यांच्या कन्या असून, त्यांची पुणे शहर पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झाली आहे. या दोघीही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे.

दोघींनी पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि जिद्द व कठोर परिश्रमाच्या बळावर हे स्वप्न साकार केले. या दोघींच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या आई-वडिलांनीही मोलाची साथ दिली.

याप्रसंगी पोहेगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन औताडे, नितीन पाचोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, बहादराबाद (ता.कोपरगाव) येथील राजेंद्र चांगदेव पाचोरे यांची कन्या प्रतीक्षा राजेंद्र पाचोरे हिची पिंपरी चिंचवड पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल कोल्हे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT