पीक विमा योजना 
अहिल्यानगर

विमा कंपन्यांची बनवेगिरी ः दुष्काळातही दाखवला सुकाळ

मार्तंड बुचुडे

पारनेर ः जिल्ह्यात २०१८ साली दुष्काळी स्थिती असल्याने रब्बी पीक आले नाही. बुहुतेक शेतकऱ्यांनी ज्वारी व इतर पिकांचा विमा उतरविला होता. कृषी विभागाने पिकाची पैसेवारी शून्य दाखवली असतानाही विमा कंपन्यांनी बागायत ज्वारीसाठी विमा मंजूर केला. मात्र, दुष्काळ असूनही जिरायत ज्वारीचे उत्पादन अधिक दाखवून विमा नाकारला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. (Insurance companies denied insurance to Ahmednagar farmers)

कृषी विभागाने पीक कापणी करून जाहीर केलेले उत्पादन ग्राह्य धरणे गरजेचे असते. त्यानुसारच शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ विमा कंपनीने देणे गरजेचे आहे. मात्र, विमा कंपन्यांनी चुकीचे उत्पादन दाखवून २०१८ मधील रब्बी पीक विम्यापासून हजारो शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे.

या बाबत अनेक शेतकऱ्यांनी तशी तक्रारही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र, याबाबत कोणीच याची दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही मागील अनेक दिवसांपासून विमा रक्कम मिळावी, यासाठी लढा देत आहोत. आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही, तो पर्यंत आम्ही लढा देणार आहोत. शेवटी न्यायालयातही जाण्याची आमची तयारी असल्याचे शेतकरी नामदेव येणारे, देविदास येणारे, उत्तम पठारे, सुभाष थोरात व भाऊसाहेब रणसिंग आदींनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

‘जिरायत’चे हेक्टरी उत्पन्न दाखविले ५७८

जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही २०१८ साली दुष्काळी स्थिती होती. जनावरांसाठी छावण्या, पाण्याचे टॅंकर सुरू होते. त्याच काळात ज्वारीचे बागायत क्षेत्रात हेक्टरी २३९ किलो, तर जिरायत क्षेत्रात ५७८ किलो उत्पादन दाखविण्याचा पराक्रम विमा कंपन्यांनी केला आहे. दुष्काळात बागायत ज्वारी पेक्षा जिरायत ज्वारीचे पीक अधिक दाखवून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे.

कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार

आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. यापूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने तालुक्यातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. नुकतीच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची याबाबत भेट घेतली. त्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगितले.

- सागर मैड, उपसरपंच, सुपे (Insurance companies denied insurance to Ahmednagar farmers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT