Interim stay on appointment of administrator of Shrirampur Bazar Samiti 
अहिल्यानगर

श्रीरामपूर बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार संचालक मंडळ सहा महिन्यांसाठी पुढे कायम ठेवायचे की, प्रशासक नेमणुकीच्या निर्णयासाठी १५ दिवसांची मुदत मिळाली होती. परंतु आज येथील बाजार समितीवर प्रशासकाची नेमणुकीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिल्याची माहिती सचिव किशोर काळे यांनी दिली.

सदर माहिती मिळताच सत्ताधारी गटाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती मिळविली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतबाह्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नियुक्त्या झाल्या. तसेच राज्यातील विविध बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला मुदतवाढी मिळाल्या. परंतु श्रीरामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच सप्टेंबरला मदत संपली. आणि आज प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाले.

येथील संचालक मंडळाने मुदतवाढीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान, संचालक मंडळाला सहा महिन्यांसाठी कायम ठेवायचे की, प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेण्यासाठी खंडपीठाने १५ दिवसांची मुदत दिली होती.

पंधरा दिवस उलटुनही संचालक मंडळाने हालचाल न केल्याने अखेर आज प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाले. त्याची माहिती मिळताच सत्ताधारी गटाने तत्काळ खंडपीठात धाव घेतली. त्यामुळे प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती देत संचालक मंडळाला पुढील आठ दिवस कामकाज पहाण्यास मुदतवाढ दिल्याचे संचालक दीपक पटारे यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT