Interrogation of fighting police by seniors 
अहिल्यानगर

कलेक्शनवरून भांडणारे पोलिस चौकशीत म्हणाले, आम्ही तर आम्ही "गांधी"वादी

सकाळ वृत्तसेवा

राहुरी ः 'कलेक्शन'च्या वादातून मारामारी करणाऱ्या त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलावून सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी चौकशी केली. "खरं सांगितलं. तर कारवाई होईल. मारामारी अंगलट येईल." या भीतीने तिघांनी घुमजाव केले. "मारामारी झालीच नाही!" असे सांगत आम्ही नाही त्यातले...असा पवित्रा त्यांनी घेतला. 

'सकाळ' मध्ये काल (रविवारी) घटनेची बातमी प्रसिद्ध होताच, जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली. काल दुपारी दोन वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. काळे तातडीने चौकशीकामी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासमक्ष तिघांना एकत्र बोलावून डॉ. काळे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तिघांनीही कानावर, डोळ्यावर व तोंडावर हात ठेवले. महात्मा गांधींच्या विचाराचे आपण परमभक्त असल्याचे त्या तिघांनी मॅडम समोर भासविले.

दरम्यान, 'मॅडम' चौकशीला येणार असल्याचे समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिघांना बोलावून घेतले. "तुमच्यापैकी एकाने जरी कबुली दिली. तरी, तिघांवर कारवाई होईल. तिघांचीही तत्काळ पोलीस मुख्यालयात बदली होईल. भांडण थांबवा. एकत्र या. एक विचाराने रहा. अशी घटना घडलीच नाही. असे सांगा." अशी सल्लावजा कानउघडणी वरिष्ठांनी केली. त्यामुळे त्या तिघांनी चौकशीत घुमजाव केल्याचे बोलले जाते.

विशेष म्हणजे, राहुरी पोलीस ठाण्यात अनेक पोलिस कर्मचारी आहेत. परंतु, मारामारी करणाऱ्या नेमक्या त्याच तीन पोलिसांची चौकशीला झाली. यातून घटनेतील सत्यता अधोरेखित होते. त्या तिघांपैकी एकाच्या पाठीवर एका दगडाचा मार लागला आहे. त्याची तपासणी झाली काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या अपरोक्ष प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी झाली असती तर, त्या तिघांमध्ये एकवाक्यता राहिली नसती. वस्तुस्थिती समोर आली असती. परंतु, एकत्रित चौकशी केवळ फार्स ठरणार आहे. अशी राहुरीच्या पोलीस वर्तुळात चर्चा सुरू आहे. चौकशीत त्यांनी आम्ही तर गांधीवादी आहोत, असे सांगितले. नेमके नोटेवरील गांधीजींचे हे भक्त असावेत, अशी चर्चा सुरू आहे.
या बाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी 'प्रत्यक्ष भेटून बोलू.' असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT