Invitation to "Corona" at the wedding 
अहिल्यानगर

लोक लग्नात मग्न... पसरवी कोरोनाचे विघ्न... 

दीपक रोकडे

नगर ः लग्नाच्या माध्यमातून रेशीमगाठी बांधल्या जाऊन दोन कुटुंबे एकत्र येत आहेत. या सोहळ्यांना नातलगांसह मित्रपरिवार नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. कोरोनाच्या काळातही 50 जणांची परवानगी असतानाही, त्यापेक्षा जास्त व्यक्ती आता उपस्थित राहत असल्यामुळे कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार आता जिल्ह्यात घडू लागला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात असून, लग्नसोहळा, वर्षश्राद्ध आदी कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे त्यावर पाणी फेरले जात आहे. प्रशासनाने लग्नसोहळा व अंत्यविधीसाठी 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी दिलेली आहे. हे सर्व कार्यक्रम पार पाडताना सामाजिक अंतरासह सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, असे निर्बंध घातले आहेत. मात्र, या निर्बंधांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्यामुळे, आता कोरोनाचा प्रादुर्भाव लग्नसमारंभांतून होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळ्यावरून परतलेले काही जण कोरोनाबाधित आढळून आल्याचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये आढळून आले आहे. 

लग्नसोहळ्याला काही जण परजिल्ह्यांतून वैद्यकीय प्रमाणपत्र काढून, तर काही विनापरवानगी येऊन हजेरी लावत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव या माध्यमातून होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. शहरासह गावात लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांवर देखरेख करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप निश्‍चित झालेली नाही. ती निश्‍चित होणे अपेक्षित आहे. त्यानंतर लग्नसमारंभातील उपस्थिती व नियमांचे पालन होणार आहे. अन्यथा, लग्नसोहळ्यातून गावागावांत कोरोनाला आमंत्रण दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

कारवाईच्या भीतीने लवकरच मुहूर्त 
लग्नांना होणारी नातलगांची गर्दी लक्षात घेऊन, कारवाईच्या भीतीमुळे वधू-वर पक्षांकडून आता लग्नाचा मुहूर्त सकाळी आठ ते दहादरम्यानचा काढण्यास सुरवात झाली आहे. 

लग्नसमारंभासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे; परंतु प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्‍यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित तहसीलदारांकडून कारवाई केली जाईल. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर 
.....  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT