nevase  
अहिल्यानगर

नेवासे येथील पुनर्वसित गावांच्या कामांची होणार पोलखोल!

सुनील गर्जे

नेवासे (नगर) : तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित १६ गावांमध्ये नागरी सुविधा अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात झालेल्या कामांची पाटबंधारे विभागामार्फत चौकशी होणार असून त्यासाठी या विभागाने एक चौकशी समितीही नेमली आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत नेवासे तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे लेखी तक्रार देऊन कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

तालुक्यातील पुनर्वसित १६ गावांमध्ये सन २०१७-१८ मध्ये जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक- १ अंतर्गत पुनर्वसित गावठाण्यात स्मशानभूमी, रस्ता कामे, ग्रामपंचायत इमारत, समाज मंदिरे अशी २१ नागरी सुविधा कामे मुळा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आली होती. त्यासाठी शासकीय निधीतून जवळजवळ पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आली. मात्र संबंधित ठेकेदाराने ही कामे नियमाप्रमाणे न करता अत्यंत निकृष्ट दर्जाची केली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी करत अल्पावधित ही कामे लोकांसाठी सुविधेची ठरण्याऐवजी कुचकामी ठरल्याने या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याची तक्रार नेवासे काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांकडे केली होती. 
     
दरम्यान ग्रामस्थांच्या तक्रारीची तालुका काँग्रेस कमिटीने दखल घेऊन बहुतांश कामाची पाहणी केल्यावर ग्रामस्थांच्या आरोपात तथ्य आढळून आल्यावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे यांनी नगर येथे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन सर्वच २१ कामांची उच्चस्तरीय चौकशी करून यात दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी केली. कारवाई न झाल्यास (ता.१) ऑक्टोबर रोजी नगर कार्यालयासमोर बेमुदत धरणे व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
 
दरम्यान या तक्रारीची दखल घेत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी पाटबंधारेच्या वतीने अधिकाऱ्यांची तांत्रिक समितीची नेमणूक केली. तसेच समितीने तक्रार केलेल्या २१ पुनर्वसन कामाला प्रत्यक्ष भेट देऊन कामातील अनियमितता व दर्जाबाबत तांत्रिक तपासणी करून पंधरा दिवसाच्या आत मुद्देसूद अहवाल विभागीय कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहे. काँग्रेस कमिटीने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुनर्वसित गावांना न्याय मिळेल अशी अपेक्षा पुनर्वसित गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

या कामांची होणार चौकशी
 
बेलपिंपळगाव-जैनपूर, धामोरी-बहिरवाडी, नेवासे -भालगाव-धामोरी, सुरेगाव-बोरगाव, सुरेगाव- बेलपांढरी, तरवडी-भेंडे-गेवराई रोड, उस्थळ दुमाला-बँक रोड- कराड वस्ती, चांदगाव- उस्थळ दुमाला हे रस्ते, तरवडी, उस्थळ दुमाला, उस्थळ खालसा ,सुरेगाव दही, सुरेगाव गंगा, मंगळापुर, खलाल पिंपरी, धामोरी याठिकाणी समाज मंदिर व उस्थळ खालसा, तरवडी, फत्तेपूर येथील ग्रामपंचायत इमारत.

नेवासे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे म्हणाले, काँग्रेस या कामाचा पाठपुरावा करून यात दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कडक  कारवाई करण्याची मागणी करणार. यापुढेही पुनर्वसित गावांच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ठोस भूमिका घेणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT