अहमदनगर

फळ, भाजीपाला, फुलांचा बाजार! नेप्ती उपबाजार गैरसोयीचा

सकाऴ वृत्तसेवा

कोठी येथील मार्केटयार्डमध्येच हे बाजार भरविण्यासाठी पार्किंग व इतर सोयी निर्माण करुन योग्य नियोजन करण्याची मागणी, सर्वसामान्यांमधून होत आहे.

अहमदनगर : शहरातील कोठी येथील फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून हे विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. नेप्ती उपबाजार समितीत कोरोनानंतर भरविण्यात आलेले हे बाजार गैरसोयीचे व असुरक्षित असल्याने तेथील फळ, भाजीपाला व फुल विभाग बंद करावा. तर कोठी येथील मार्केटयार्डमध्येच हे बाजार भरविण्यासाठी पार्किंग व इतर सोयी निर्माण करुन योग्य नियोजन करण्याची मागणी, सर्वसामान्यांमधून होत आहे. (it has become inconvenient due to lack of facilities in nepti sub market)

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन महिन्यांपासून बंद असलेले शहराच्या कोठी भागातील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सुरळीतपणे नियमांचे पालन करुन सुरु झाले आहे. टाळेबंदीत हा बाजार नेप्ती उपबाजार समितीत भरविण्यात आला होता. मात्र, सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, आडत व नागरिकांचे चांगलेच हाल झाले. नेप्ती उपबाजार समिती, बायपास रस्त्यावर असून, या रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने चालत असल्याने काही शेतकरी व हमाल बांधवांचे अपघात झाले. नेप्ती उपबाजार समितीत फळ, भाजीपाला व फुलांचा बाजार गैरसोयीचा असून, कोठीतील मार्केटयार्ड मध्येच हा विभाग योग्य नियोजन करुन चालविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. शहरातील मार्केट हे शेतकरी व ग्राहक हिताचे व सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे असल्याची भावना सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, आडत व नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

आडत व्यापाऱ्यांची मागणी

कोठीतील मार्केटयार्डच्या भाजीपाला व फळ विभागात असलेल्या ओपनस्पेसवर पक्के बांधकामांचे अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हे अतिक्रमण हटविल्यास या ओपनस्पेसवर वाहने उभी करता येणार असून, होणारी वाहतूक कोंडी थांबणार आहे. मोकळ्याभुखंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक आडत व व्यापाऱ्यांची मागणी आहे. (it has become inconvenient due to lack of facilities in nepti sub market)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT