3SAIBABA_20MANDIR_20shirdi 
अहिल्यानगर

शिर्डीच्या अर्थकारणास चालना देण्यासाठी साईमंदिर खुले करणे आवश्‍यक

सतीश वैजापूरकर

शिर्डी (नगर) : कोरोनामुळे सर्वत्र ठप्प झालेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी तिरूपतीच्या धर्तीवर येथील साईमंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आज ना उद्या साईमंदिर खुले होईल, हे गृहित धरून साईबाबा संस्थानने भाविकांच्या दर्शन, भोजन व निवासव्यवस्थेचे कागदोपत्री नियोजन केले.

कोविडचे सावटामुळे फिजिकल डिस्टन्सला प्राधान्य द्यावे लागते, हा तिरूपतीचा अनुभव लक्षात घेता, भाविकांच्या संख्येवर येथेही मर्यादा येईल. साईबाबा संस्थानला सध्या जड झालेला आर्थिक भार मंदिर खुले झाल्यानंतर हळूहळू कमी व्हायला मदत होईल. बाजारपेठेच्या अर्थकारणाला गती येण्यासाठी मात्र काही काळ वाट पाहावी लागेल. 

तिरूपती देवस्थान स्वमालकीच्या डोंगरावर आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे सहज शक्‍य होते. कोविडचे सावट व फिजिकल डिस्टन्सचे महत्त्व लक्षात घेता, इच्छा असूनही भाविकांच्या संख्येत वाढ करता येत नाही. दोन महिन्यांनंतर तेथील दैनंदिन दर्शनार्थींची संख्या केवळ नऊ हजारांवर गेली. त्यात त्यांना दोन कर्मचारी गमवावे लागले. 700 कोविड रुग्णांवर उपचार करावे लागले. साईसंस्थानलाही ही तयारी ठेवावी लागेल. 

साईसंस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार येथे सुरवातीला दोन ते तीन हजार भाविकांपासून दर्शनव्यवस्था सुरू करता येईल. कोविड फैलाव नियंत्रणात राहिला, तर पुढील तीन-चार महिन्यांत ही संख्या आठ ते दहा हजारापर्यंत वाढू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. 

शिर्डीचे अर्थकारण लक्षात घेतले, तर एरवी येथे 30 ते 40 हजार भाविकांची गर्दी झाली, तरी बाजारपेठेत मंदी असल्याचे बोलले जायचे. त्या तुलनेत 8 ते 10 हजार भाविक दररोज येथे आले, तर येथील अर्थकारण फिरण्यावर फारच मर्यादा येतील. 

दरम्यान, साईसंस्थानने साईमंदिर खुले करण्याची पुर्वतयारी सुरू केली आहे. दर्शनबारीत बसविण्यासाठी 50 ऍटोमॅटिक सॅनिटायझर मशीन खरेदी केले आहेत. दोन भाविकांत सहा फुटांचे अंतर राखण्यासाठी ऑईलपेंटने गोल काढायचे आहेत. त्यासाठी साचेदेखील तयार आहेत. भाविकांच्या निवासव्यवस्थेसाठी 500 खोल्या व शेजारची एक हजार खोल्यांची धर्मशाळा तयार आहे. प्रसादालयात फिजिकल डिस्टन्सचे पालन करून भोजन व्यवस्थेची तयारी केली जाणार आहे. 

शिर्डी येथील माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके म्हणाले, ऑनलाईन आरक्षण करून भाविकांना साईदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून दर्शनव्यवस्था सुरू करणे शक्‍य आहे. राज्य सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा. 

साईबाबांच्या सेवेकऱ्यांचे वंशज नीलेश कोते म्हणाले, बाजारपेठ सहा महिन्यांपासून बंद आहे. देश-विदेशातील भाविक साईदर्शनासाठी येथे येण्यास उत्सुक आहेत. देशातील प्रमुख धर्मस्थळे दर्शनासाठी खुली झाली आहेत. हे लक्षात घेऊन साईमंदिर उघडायला हवे. 

साई संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज लोढा म्हणाले, तिरुपती देवस्थान दोन महिन्यांपूर्वी दर्शनासाठी खुले झाले. त्याच वेळी साईमंदिर खुले करणे गरजेचे होते. साईसंस्थान व येथील बाजारपेठेचे उत्पन्न बंद झाले आहे. बेरोजगारी वाढली आहे. 
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT